मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : जडेजाच्या फिरकीमध्ये फसला लाबुशेन, रहाणेने घेतला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IND vs AUS : जडेजाच्या फिरकीमध्ये फसला लाबुशेन, रहाणेने घेतला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. या टेस्ट मॅचमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सिडनी, 8 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी टेस्ट सिडनीमध्ये सुरू आहे. या टेस्ट मॅचमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेणाऱ्या जडेजाने स्टीव्ह स्मिथला रन आऊटही केलं. ऑस्ट्रेलियाला ऑल आऊट करण्यात जडेजाला बुमराह (Jasprit Bumrah) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) नेही चांगली साथ दिली. जडेजाने शानदार बॅटिंग करत असलेल्या मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) ला रहाणेकरवी कॅच आऊट केलं. रहाणेने लाबुशेनचा भन्नाट कॅच पकडला.

स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्यात तिसऱ्या विकेटसाठी 100 रनची पार्टनरशीप झाली होती. हे दोघंही भारताला मॅचमधून बाहेर काढतील, असं वाटत असतानाच जडेजाच्या फिरकीमध्ये लाबुशेन फसला आणि स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रहाणेने जबरदस्त कॅच पकडला. 91 रन करून लाबुशेन पॅव्हेलियनमध्ये परतला.

ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने 131 रन तर विल पुकोवस्कीने 62 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा 338 रनवर ऑल आऊट झाला. भारताकडून जडेजाने चार विकेट घेतल्या, तर बुमराह आणि नवदीप सैनीला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. मोहम्मद सिराजला एक विकेट घेण्यात यश आलं.

स्मिथचं 27वं शतक

पहिल्या दोन टेस्ट मॅचमध्ये फक्त 10 रन करणाऱ्या स्मिथला अखेर या मॅचमध्ये सूर गवसला. स्मिथने त्याच्या टेस्ट कारकिर्दीतलं 27 वं शतक झळकावलं. 226 बॉलमध्ये त्याने 131 रनची खेळी केली, ज्यात 16 फोरचा समावेश होता. भारताविरुद्ध 25 इनिंगमध्ये त्याचं हे 8 वं शतक होतं. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर स्मिथने तीन वर्षांनंतर टेस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावलं.

First published: