मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : तिसऱ्या टी-20 मध्ये सॅमसनऐवजी याला संधी दे, सेहवागचा विराटला सल्ला

IND vs AUS : तिसऱ्या टी-20 मध्ये सॅमसनऐवजी याला संधी दे, सेहवागचा विराटला सल्ला

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी टी-20 आज खेळवली जाणार आहे. या मॅचआधी भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने विराट (Virat Kohli) ला सल्ला दिला आहे.

    सिडनी, 8 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातली तिसरी टी-20 आज खेळवली जाणार आहे. या सीरिजमध्ये भारताने आधीच 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे विराटची टीम आज ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश करण्यासाठी मैदानात उतरेल. शेवटच्या टी-20 साठी विराट कोहली (Virat Kohli) टीममध्ये काही बदल करू शकतो. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने विराटला सल्ला दिला आहे. शेवटच्या मॅचसाठी विराटने संजू सॅमसन (Sanju Samson) ऐवजी मनिष पांडे (Manish Pandey) याला संधी मिळावी, असं मत सेहवागने मांडलं आहे. संजू सॅमसनने या टी-20 सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली नाही. विराटने विजयाचा फॉर्म्युला सोडू नये, पण तो संजू सॅमसनऐवजी मनिष पांडेला संधी देऊ शकतो, असं सेहवाग म्हणाला. 'टीममध्ये जबरदस्ती बदल करण्याची काही गरज नाही, असं मला वाटतं. पण जर मनिष पांडे फिट झाला, तर त्याला संधी मिळायला पाहिजे. संजू सॅमसनऐवजी त्याला खेळवलं जाऊ शकतं. सॅमसनने मागच्या दोन्ही मॅचमध्ये रन केल्या नाहीत. विराटलाही टीम बदलण्याची सवय आहे,' अशी प्रतिक्रिया सेहवागने सोनी सिक्सशी बोलताना दिली. मनिष पांडेला कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मॅचमध्ये संधी मिळाली होती, पण तो फक्त 2 रन करून आऊट झाला, पण दुसऱ्या टी-20 वेळी त्याच्या कोपराला दुखापत झाली, त्यामुळे श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली. 2016 साली पांडे पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. सिडनीमध्ये झालेल्या मॅचमध्ये त्याने 104 रनची नाबाद खेळी केली होती. आतापर्यंत पांडेने 39 टी-20मध्ये 709 रन केले आहेत, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. चांगली कामगिरी करूनही पांडेला लागोपाठ संधी मिळत नाही. दुसरीकडे 25 वर्षांच्या संजू सॅमसनला आतापर्यंत दोन टी-20 मॅचमध्ये संधी मिळाली, पण त्याला या दोन्ही मॅचमध्ये अपयश आलं. कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये त्याने 23 रनची खेळी केली होती, तर सिडनीमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये तो 15 रनवर आऊट झाला होता. सॅमसनकडे भविष्य म्हणून पाहिलं जात असेल, तर त्याला मात्र संधी मिळू शकते.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या