मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : DRS चा वाद, अंपायरने नाकारला विराटचा रिव्ह्यू

IND vs AUS : DRS चा वाद, अंपायरने नाकारला विराटचा रिव्ह्यू

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या तिसऱ्या टी-20 मॅचदरम्यान DRS चा वाद पाहायला मिळाला. विराट कोहली (Virat Kohli) ने घेतलेला मॅथ्यू वेड (Mathew Wade) याचा रिव्ह्यू अंपायरने नाकारला.

  • Published by:  Shreyas
सिडनी, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) 12 रनने पराभव झाला, पण या मॅचमध्ये डीआरएसवरून वाद पाहायला मिळाला. मॅचदरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने घेतलेल्या रिव्ह्यूला अंपायरकडून नाकारण्यात आलं. विराटने मोठ्या स्क्रीनवर बघून हा रिव्ह्यू घेतल्याचं सांगत अंपायरने हा रिव्ह्यू नाकारला. यानंतर विराटने अंपायरशी वादही घातला, पण त्याला संपूर्ण स्थितीची माहिती देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा ओपनर मॅथ्यू वेड याच्या विकेटवरून भ्रम निर्माण झाला होता. 11व्या ओव्हरमध्ये वेड 35 बॉलमध्ये 50 रनवर खेळत होता, त्यावेळी टी नटराजनने टाकलेला बॉल वेडच्या पॅडला लागला. यावेळी विराट लॉन्ग ऑनला फिल्डिंग करत होता. तिकडूनच विराटने विकेट कीपर केएल राहुलसोबत डीआरएस घ्यायचा का नाही, याबाबत चर्चा केली. यानंतर विराट सीमारेषेजवळ पुन्हा फिल्डिंगला जात असताना त्याने मोठ्या स्क्रीनवर रिप्ले बघितला आणि रिव्ह्यू घ्यायचा निर्णय घेतला. वेड स्ट्राईक घेण्यासाठी पुन्हा तयार झाला तेव्हा राहुलने त्याला रिव्ह्यू घेतल्याचं सांगितलं. यानंतर वेडने याला विरोध केला. विराटने मोठ्या स्क्रीनवर रिप्ले बघितल्याचं वेडने स्क्वेअर लेग अंपायरला सांगितलं. रिव्ह्यू दरम्यान तिसऱ्या अंपायरने हा रिव्ह्यू नाकारला. या रिव्ह्यूबाबत आम्ही पुढे जाऊ शकत नाही, कारण मोठ्या स्क्रीनवर आधीच रिप्ले दाखवण्यात आला आहे, असं तिसऱ्या अंपायरने सांगितलं. नियमानुसार रिप्ले बघितला तर रिव्ह्यू घेता येत नाही. जर कोहलीने रिप्ले न बघता रिव्ह्यू घेतला असता तर वेड आऊट झाला असता. मॅथ्यू वेडने या मॅचमध्ये 53 बॉल खेळून 80 रनची शानदार खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधला वेडचा हा सर्वाधिक स्कोअर होता. वेडच्या या खेळीमुळे भारताला ऑस्ट्रेलियाने 187 रनचं आव्हान दिलं.
First published:

पुढील बातम्या