मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : विराटचा एकाकी संघर्ष! तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा पराभव, सीरिज मात्र जिंकली

IND vs AUS : विराटचा एकाकी संघर्ष! तिसऱ्या टी-20 मध्ये भारताचा पराभव, सीरिज मात्र जिंकली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) पराभव 12 रनने पराभव झाला आहे. या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी भारताने ही टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली आहे.

    सिडनी, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये भारताचा पराभव 12 रनने पराभव झाला आहे. या मॅचमध्ये पराभव झाला असला तरी भारताने ही टी-20 सीरिज 2-1 ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 187 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 20 ओव्हरमध्ये 174-7 एवढाच स्कोअर करता आला. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने 61 बॉलमध्ये 85 रनची खेळी केली. तर शिखर धवनने 21 बॉलमध्ये 28 रन केले. विराटशिवाय दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्वॅपसन याने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, एन्ड्रयू टाय आणि एडम झम्पा याला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. त्याआधी मॅथ्यू वेड (Mathew Wade) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 20 ओव्हरमध्ये 186-5 एवढा स्कोअर केला. या मॅचमध्ये टीम इंडियाची फिल्डिंगही खराब झाली. मॅक्सवेल याचे दोन कॅच युझवेंद्र चहलने सोडले. 36 बॉलमध्ये 54 रन करून मॅक्सवेल आऊट झाला, तर मॅथ्यू वेडने 53 बॉलमध्ये 80 रन केले. टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतलेल्या भारताची सुरुवात चांगली झाली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच शून्य रनवर आऊट झाला. यानंतर वेडने स्मिथ आणि मॅक्सवेलसोबत पार्टनरशीप करून ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला आकार दिला. स्टीव्ह स्मिथ 23 बॉलमध्ये 24 रन करून आऊट झाला. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरला 2 विकेट मिळाल्या, तर टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर याला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मॅचमध्ये (India vs Australia) भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यामुळे भारताने ही सीरिज आधीच खिशात टाकली आहे. याआधी पहिल्या टी-20 मध्ये भारताचा 11 रनने तर दुसऱ्या टी-20 मध्ये 6 विकेटने विजय झाला होता. या मॅचमध्ये भारताने टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत, तर ऑस्ट्रेलियाने मार्कस स्टॉयनिसऐवजी कर्णधार एरॉन फिंच टीममध्ये परतला आहे. भारतीय टीम शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, टी. नटराजन, युझवेंद्र चहल ऑस्ट्रेलियाची टीम एरॉन फिंच, मॅथ्यू वेड, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, डीआरसी शॉर्ट, मोईसेस हेनरिक्स, डॅनियल सॅम्स, सीन एबॉट, मिचेल स्वेपसन, एन्ड्रयू टाय, एडम झम्पा
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या