मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ...त्यावेळी आम्हाला मैदान सोडायला सांगण्यात आलं, रहाणेचा धक्कादायक खुलासा

IND vs AUS : ...त्यावेळी आम्हाला मैदान सोडायला सांगण्यात आलं, रहाणेचा धक्कादायक खुलासा

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विजय मिळवून इतिहास घडवला. भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासोबतच कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने सिडनी टेस्टमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळेही त्याचं कौतुक होत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मुंबई, 25 जानेवारी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विजय मिळवून इतिहास घडवला. सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता. पण यानंतर जोरदार पुनरागमन करत भारताने 2-1 ने विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाचं सगळीकडूनच कौतुक होत आहे, कारण टीमचे बहुतेक खेळाडू तरुण होते. विराट कोहली, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, हनुमा विहारी आणि आर.अश्विन यांच्याशिवाय भारतीय टीम शेवटच्या टेस्टमध्ये मैदानात उतरली, तरीही भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. भारताला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासोबतच कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ने सिडनी टेस्टमध्ये घेतलेल्या भूमिकेमुळेही त्याचं कौतुक होत आहे. सिडनी टेस्टमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली, यानंतर लगेचच अजिंक्य रहाणेने ऍक्शन घेतली. सिडनी टेस्टमध्ये मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) बाबत वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली. यानंतर भारतीय टीमने याबाबत तक्रारही दाखल केली. रहाणेने स्पोर्ट्स टुडेशी बोलताना याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सिडनीतल्या वर्णद्वेषी टिप्पणीनंतर आपल्याला मैदान सोडून जाण्याबाबतही सांगण्यात आलं होतं, असं सांगितलं आहे. 'सिडनीमध्ये सिराज आणि बाकी काही खेळाडूंसोबत ज्या गोष्टी झाल्या त्या निराशाजनक होत्या. आम्ही कडक पावलं उचलली. आम्हाला मैदानाबाहेर जायचा पर्यायही देण्यात आला होता, पण आम्ही तसं केलं नाही, कारण आम्ही तिकडे खेळण्यासाठी गेलो होतो. आम्ही आमच्या खेळाडूंचा सन्मान करतो आणि नेहमीच त्यांच्यासोबत असू,' अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. 'मी सिराजसाठी खुश आहे. वडिलांच्या मृत्यूनंतरही तो खंबीर होता. त्याला टीमसोबत राहायचं होतं. नेटमध्येही तो खूप मेहनत करत होता. ऑस्ट्रेलियात त्याला जे यश मिळालं, त्याचं श्रेय सिराजचंच आहे,' असं वक्तव्य रहाणेने केलं. दरम्यान मैदानावरच्या अंपायरनी सिडनी टेस्टदरम्यान मॅच सोडून देण्याचा पर्याय दिला असल्याचं मोहम्मद सिराजने काहीच दिवसांपूर्वी सांगितलं होतं.
First published:

पुढील बातम्या