मेलबर्न, 28 डिसेंबर : इंडिया आणि ऑस्ट्रेलिया(Ind vs Aus) यांच्यात मेलबर्नमध्ये दुसरी टेस्ट मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये इंडियन टीम आघाडीवर असून तिसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर इंडियन टीमकडे आघाडी असून ऑस्ट्रेलियाच्या सहा विकेट पडल्या आहेत. त्यामुळं चौथ्या दिवशी मोठी संधी असून या मॅचमध्ये Team India विजय मिळवू शकते. या मॅचमध्ये इंडियन टीममध्ये चार बदल केलेलं असून वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) याच्याजागी ऋषभ पंत (Rishabh Pant) याला संधी देण्यात आली आहे.
या मॅचमध्ये रिषभ पंतने (Rishabh Pant) पहिल्या इनिंगमध्ये विशेष कामगिरी केली नसून त्याला केवळ 29 रन काढता आल्या आहेत. त्याचबरोबर आज त्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स याचा कॅच सोडल्याने त्याच्यावर टीका करण्यात येत आहे. याचबरोबर त्याने 2018 पासून सर्वात जास्त कॅच सोडले असून सर्वात जास्त कॅच सोडणारा विकेटकिपर म्हणून देखील त्याच्या नावाची नोंद झाली आहे.
आज रविचंद्रन अश्विन(Ravichandran Ashwin) याच्या बॉलिंगवर रिषभ पंत(Rishabh Pant) याने पॅट कमिन्सचा अतिशय सोपा कॅच सोडला. 11 रनवर कमिन्स खेळत असताना कट लागून बॉल पंतकडे गेला. पण त्याने हा कॅच सोडल्यानंतर कमेंट्री बॉक्समधून देखील त्याच्यावर टीका करण्यात आली. माजी खेळाडू विवेक राजदान यांनी पंतच्या टेक्निकवर टीका करत त्याची बॉल पकडण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हटले. रिषभ पंत (Rishabh Pant) याने 2018 पासून आतापर्यंत 11 कॅच सोडले असून 85 कॅच पकडले आहेत. रिषभ पंत(Rishabh Pant) आणि वृद्धिमान सहा(Wruddhiman Saha) यांची तुलना केल्यास दोघांचीही कॅच पकडण्याची आणि सोडण्याची सरासरी जवळपास सारखीच आहे. परंतु आजच्या मॅचमध्ये अतिशय सोपा कॅच सोडल्याने त्याच्यावर टीका करण्यात येत आहे.
दरम्यान, या टेस्ट मॅचमध्ये त्याने आतापर्यंत 3 कॅच पकडले असून ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन टीम पेन (Tim Paine) याचा अतिशय उत्तम कॅच त्याने पकडला आहे. रवींद्र जडेजाच्या(Ravindra Jadeja) बॉलिंगवर त्याने हा कॅच पकडला होता. त्यामुळं आता जर रिषभ पंत (Rishabh Pant) याने पुढील मॅचमध्ये आपल्या बॅटिंगवर आणि विकेट कीपिंगवर मेहनत केली नाही तर त्याला टीममधून बाहेर बसावे लागू शकते.