मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : म्हणून पुजाराऐवजी रोहित शर्माला देण्यात आलं उपकर्णधारपद

IND vs AUS : म्हणून पुजाराऐवजी रोहित शर्माला देण्यात आलं उपकर्णधारपद

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या टेस्टआधी बीसीसीआय (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. उरलेल्या दोन्ही मॅचसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्याऐवजी उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.

पुढे वाचा ...

मेलबर्न, 2 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या टेस्टआधी बीसीसीआय (BCCI) ने मोठा निर्णय घेतला आहे. उरलेल्या दोन्ही मॅचसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) याला चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्याऐवजी उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. रोहित वनडे आणि टी-20 टीमचा उपकर्णधारही आहे. विराट कोहली (Virat Kohli) पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) ला टीम इंडियाचं नेतृत्व देण्यात आलं, तर मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टसाठी चेतेश्वर पुजारा टीमचा उपकर्णधार होता.

रोहित शर्मा नियमित ओपनर म्हणून टेस्ट क्रिकेटमध्ये फक्त 5 मॅच खेळला आहे. नोव्हेंबर 2019 नंतर रोहित एकही टेस्ट खेळला नाही, यानंतरही त्याला मोठी जबाबदारी मिळाली. पीटीआयमध्ये आलेल्या वृत्तानुसार टीम प्रशासनाने आधीच हा निर्णय घेतला होता, की रोहित फिट झाल्यानंतर जेव्हा तो टीमशी जोडला जाईल तेव्हा त्याला उपकर्णधारपद देण्यात येईल.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार 'विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्यला कर्णधार बनवल्यानंतर उपकर्णधाराबाबत कोणतीही शंका नव्हती. रोहितलाच उपकर्णधार करण्यात येणार होतं. जोपर्यंत रोहित फिट होत नाही, तोपर्यंत पुजाराला ही जबाबदारी देण्यात आली होती. रोहित बऱ्याच कालावधीपासून मर्यादित ओव्हरच्या टीमचा उपकर्णधार आहे, त्यामुळे विराटच्या गैरहजेरीत तो टीमच्या नेतृत्व समुहाचा भाग असेल.'

रोहित शर्माच्या सरावाला सुरूवात

रोहित शर्मा क्वारंटाईन संपल्यानंतर टीमसोबत आला आहे. मेलबर्नमध्ये त्याने सरावालाही सुरूवात केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये रोहित ओपनिंगला शुभमन गिलसोबत खेळणार का मधल्या फळीत खेळणार, याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. जर रोहित ओपनिंगला खेळला तर मयंक अगरवालला बाहेर बसावं लागेल, तसंच त्याला मधल्या फळीत खेळवण्यात आलं, तर हनुमा विहारीला डच्चू मिळेल. रोहितने 32 टेस्ट मॅचमध्ये 46 च्या सरासरीने 2,141 रन केल्या आहेत. भारतीय टीम 5 जानेवारीला सिडनीला रवाना होणार आहे. 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये तिसऱ्या टेस्टला सुरूवात होणार आहे.

First published:
top videos