IND vs AUS : तिसऱ्या टेस्टमध्ये या खेळाडूचं पदार्पण, उमेश यादवऐवजी संधी!

IND vs AUS : तिसऱ्या टेस्टमध्ये या खेळाडूचं पदार्पण, उमेश यादवऐवजी संधी!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने विजय झाला, पण तरीही भारताला या मॅचमध्ये मोठा धक्का लागला. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) याला दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करताना पोटरीला दुखापत झाली.

  • Share this:

मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) 8 विकेटने विजय झाला, पण तरीही भारताला या मॅचमध्ये मोठा धक्का लागला. फास्ट बॉलर उमेश यादव (Umesh Yadav) याला दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करताना पोटरीला दुखापत झाली, त्यामुळे तो फक्त 3.3 ओव्हरच टाकू शकला. आता तिसऱ्या टेस्टमध्येही उमेश यादवच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे उमेश यादवऐवजी डावखुरा फास्ट बॉलर टी.नटराजन ( T.Natrajan) याला खेळण्याची संधी मिळू शकते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार उमेश यादव शेवटच्या टेस्ट मॅचपर्यंत फिट होऊ शकतो.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश यादवचा स्कॅनिंगचा रिपोर्ट आला आहे. शेवटच्या मॅचला अजून दोन आठवड्यांचा वेळ आहे, तोपर्यंत उमेश पूर्णपणे फिट होईल. उमेशच्याऐवजी नटराजनला संधी मिळू शकते, कारण टीमकडे पर्याय कमी आहेत, आणि नटराजन याने मर्यादित ओव्हरच्या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली आहे, असं सूत्रांनी सांगितलं.

नटराजन हा नेट बॉलर म्हणून टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेला होता. वनडे सीरिजमधून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. शेवटच्या दोन वनडेमध्ये नटराजनने 70 रन देऊन 2 विकेट घेतल्या. यानंतर तीन टी-20 मॅचमध्ये त्याला 6 विकेट मिळाल्या. टी नटराजन याच्याशिवाय टीम इंडियाकडे फास्ट बॉलर म्हणून शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे दोन पर्याय आहेत.

Published by: Shreyas
First published: December 29, 2020, 12:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading