IND vs AUS : अजिंक्य रहाणेवर कर्णधारपदाचा दबाव? गावसकर म्हणतात...

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारी 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार असल्यामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. याबाबत सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मत मांडलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारी 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार असल्यामुळे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. याबाबत सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी मत मांडलं आहे.

  • Share this:
मुंबई, 15 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील टेस्ट सीरिजला गुरुवारी 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडिया जोरदार सराव करत आहे. पहिली टेस्ट डे -नाईट असून ऍडलेडमध्ये खेळली जाणार आहे. या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला विराट कोहलीची (virat kohli) उणीव भासणार आहे. पहिल्या टेस्टनंतर नियमित कॅप्टन विराट कोहली पुन्हा भारतात परतणार आहे. त्यानंतर भारताचे कर्णधारपद अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडे सोपवले जाणार आहे. उर्वरित तीन मॅचमध्ये रहाणे टीमचं नेतृत्व करणार आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे. अजिंक्य रहाणेच्या कॅप्टन्सीवर भारताचे माजी दिग्गज प्लेअर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भाष्य केले आहे. सुनील गावसकर यांना रहाणेच्या नेतृत्वात भारतीय टीमकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. विराटच्या अनुपस्थित रहाणे कोणत्याही दबावाखाली येणार नाही आणि तो पुढे होऊन टीमचे नेतृत्व करेल, असे गावस्कर म्हणाले. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू असलेल्या सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सच्या गेम प्लान कार्यक्रमाच्या मुलाखतीत सांगितले, 'रहाणेवर नेतृत्वासाठी कोणताही दबाव असणार नाही. त्याने दोन वेळा टीमचे नेतृत्व केले आहे. रहाणेने धर्मशाला इथं झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पहिल्यांदा टीमचं नेतृत्व केलं होतं. या मॅचमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला होता. त्यानंतर अफगाणिस्तानविरूद्धही (Afganistan) त्याच्याच नेतृत्वात भारताने दोन दिवसांत मॅच जिंकली होती. त्यामुळे रहाणेवर नेतृत्वाचा कुठलाही दबाव असणार नाही. कारण त्याला माहीत आहे, तो फक्त 3 टेस्ट मॅचसाठी हंगामी कॅप्टन आहे. त्याचबरोबर तो प्रामाणिक असून सराव सामन्यामध्ये त्याने ज्या पद्धतीने नेतृत्व केलं त्याच पद्धतीने तो या मॅचमध्ये देखील नेतृत्व करेल', अशी आशा गावसकर यांना आहे. चेतेश्वर पुजाराच्या ( Cheteshwar Pujara) कामगिरीवर बोलताना ते म्हणाले, 'या सीरिजमध्ये पुजाराच्या कामगिरीवर देखील टीम इंडियाचा विजय अवलंबून असणार आहे. भारताला या सीरिजमध्ये विजय मिळवायचा असेल, तर पुजाराला दीर्घकाळ बॅटिंग करावी लागणार आहे. अजिंक्य चेतेश्वर पुजारासोबत भारताच्या बॅटिंगचंही नेतृत्व करेल. या दोन्ही अनुभवी खेळाडूंवर अधिक जबाबदारी राहील.' पुजाराने मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2018-19 च्या टेस्ट सीरिजमध्ये सर्वात जास्त रन करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. या सीरिजमध्ये त्याने 521 रन करत 'प्लेयर ऑफ द सीरिज' हा पुरस्कार देखील मिळवला होता. त्यामुळे या सीरिजमध्ये देखील 20 दिवसांपैकी 15 दिवस त्याने बॅटिंग करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मानसिकदृष्ट्या देखील तो मजबूत आहे. त्याच्या मनावर मधल्या काळात कोणत्याही सीरिजमध्ये न खेळण्याचा काहीही फरक पडणार नसल्याचे देखील गावसकर यांनी या वेळी म्हटले आहे. दरम्यान, या टेस्ट सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडन ( Matthew Hayden) यानेदेखील चेतेश्वर पुजारा याचे कौतुक केले आहे. आजच्या या पिढीमध्ये खेळाडूचे स्ट्रोक आणि स्ट्राईक रेटसाठी कौतुक करण्यात येते. पण चेतेश्वर पुजाराचा टेस्ट क्रिकेटमध्ये 45 चा स्ट्राईक रेट आहे, त्यामुळे या प्रकारातील टीम इंडियाचा तो महत्त्वाचा खेळाडू आहे, अशी प्रतिक्रिया हेडनने दिली आहे.
First published: