मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ‘सध्याची ऑस्ट्रेलियन टीम म्हणजे...’, सचिन तेंडुलकरचं गंभीर वक्तव्य

IND vs AUS : ‘सध्याची ऑस्ट्रेलियन टीम म्हणजे...’, सचिन तेंडुलकरचं गंभीर वक्तव्य

क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) . सचिननं त्याच्या कारकीर्दीमध्ये अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा सामना केला आहे.

क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) . सचिननं त्याच्या कारकीर्दीमध्ये अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा सामना केला आहे.

क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) . सचिननं त्याच्या कारकीर्दीमध्ये अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा सामना केला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 31 डिसेंबर: ऍडलेड टेस्टमधल्या पराभवानंतर टीम इंडियाने (India vs Australia) जोरदार पुनरागमन करत मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये धडाकेबाज विजय मिळवला. पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगने निराशाजनक कामगिरी केली. एकेकाळी समोरच्या टीमपुढे दहशत निर्माण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला आता काय झालं? असा प्रश्न अनेक क्रिकेट रसिकांना पडला. क्रिकेट विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar). सचिननं त्याच्या कारकीर्दीमध्ये अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा सामना केला. आता तो सध्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा खेळ मैदानाच्या बाहेरुन पाहत आहे. तेव्हाच्या आणि  सध्याच्या ऑस्ट्रेलियन टीममधील फरक सांगताना सचिननं एक महत्वाचं निरिक्षण मांडलं आहे.

‘’सध्याची ऑस्ट्रेलियन टीम ही अस्थिर आहे. या टीममधील काही खेळाडू स्वत:च्या जागेसाठी संघर्ष करत आहेत.  मी या ऑस्ट्रेलियन टीमची बॅटिंग ऑर्डर आणि पूर्वीच्या टीमची बॅटिंग ऑर्डर याचा विचार करतो तेंव्हा मला वाटतं की पूर्वीची टीम जास्त स्थिर होती. ते वेगळेच खेळाडू होते. त्यांची वृत्ती वेगळी होती. मला ही टीम पूर्ण स्थिर वाटत नाही.” असं थेट वक्तव्य सचिननं केलं आहे.

टीममध्ये जागा मिळवण्यासाठी संघर्ष

“टीम इंडियानं (Team India) पहिल्या दोन टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला तीनदा ऑल आऊट केलं. या तीन इनिंगमध्ये त्यांना फक्त 191,195 आणि 200 रन करता आले. बॉर्डर, मार्क टेलर आणि वॉ बंधूंच्या काळात असं कधी पाहयला मिळालं नाही. इतकंच नाही तर रिकी पॉन्टिंग, मॅथ्यू हेडन, डेमियन मार्टिन, गिलख्रिस्ट आणि मायकल क्लार्क यांच्या ऑस्ट्रेलियन टीमबद्दल असं घडत नव्हतं. या ऑस्ट्रेलियन टीममधले काही खेळाडू फॉर्ममध्ये नाहीत. त्यामुळे त्यांची टीममधील जागा निश्चित नाही. पूर्वीच्या टीममधील खेळाडूंची जागा निश्चित होती. त्यामुळे त्यांची बॅटिंग ऑर्डर स्थिर होती.’’ या शब्दात सचिननं जुन्या आणि सध्याच्या ऑस्ट्रेलियन टीममधील फरक सांगितला आहे.

स्मिथ, अश्विनविरुद्ध का चाचपडतो?

स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि आर. अश्विन (R. Ashwin) यांच्यातील लढत हा देखील या सीरिजमधील एक चर्चेचा मुद्दा आहे. स्मिथ अश्विन विरुद्ध का अयशस्वी होत आहे, याचं कारणंही सचिननं सांगितलं.

“पहिल्या टेस्टमध्ये स्मिथ आर्म बॉलवर आऊट झाला. अश्विन वेगळ्या पद्धतीनं बॉलिंग करतो. त्यामुळे त्याचा सरळ बॉलही वेगानं बाहेर जातो. दुसऱ्या टेस्टमध्ये स्मिथला टाकलेला बॉल वेगवान नव्हता. मात्र तो बॉल अश्विननं वळवला होता. स्मिथनं तो बॉल नेहमीचा ऑफ स्पिन समजून फ्लिक केला. कोणताही बॅट्समन हेच करेल. त्यामुळेच त्या ठिकाणी कॅच घेण्यासाठी फिल्डर सज्ज होता,’’ असं सचिननं स्पष्ट केलं.

“अश्विननं स्मिथची विकेट घेण्यासाठी उत्तम योजना बनवली होती. ते दोघंही जागतिक स्तरावरचे खेळाडू आहेत. त्यामुळे भविष्यात दोघांपैकी कुणीही बाजी मारु शकतं. मात्र पहिल्या दोन टेस्टचा विजेता अश्विन आहे.’’ असं सचिननं सांगितले.

First published:

Tags: Cricket