मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : कोण जिंकणार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी? शेन वॉर्नने केली भविष्यवाणी

IND vs AUS : कोण जिंकणार बॉर्डर-गावसकर ट्रॉफी? शेन वॉर्नने केली भविष्यवाणी

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला उद्या 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) याने या सीरिजबाबत भविष्यवाणी केली आहे.

    ऍडलेड, 16 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टेस्ट सीरिजला उद्या 17 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडच्या मैदानात गुलाबी बॉलने डे-नाईट टेस्ट मॅच खेळवली जाईल. 4 टेस्ट मॅचच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मध्ये भारतासाठी वेगळी आव्हानं असतील. फास्ट बॉलर ईशांत शर्मा (Ishant Sharma) दुखापतीमुळे सीरिजबाहेर आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) कधी फिट होतील आणि खेळतील. याबाबत स्पष्टता नाही. विराट कोहली (Virat Kohli) पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर बाळाच्या जन्मासाठी घरी परतणार आहे. भारतापुढे ही सगळी आव्हान असताना ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) याने या सीरिजबाबत भविष्यवाणी केली आहे. 2018-19 साली भारताने ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकली होती, त्यावेळी भारताच सीरिज जिंकण्याचा दावेदार होता, कारण त्यावेळी भारताची टीम ऑस्ट्रेलियापेक्षा चांगली होती, असं शेन वॉर्न म्हणाला. 'टेस्ट क्रिकेट हा सगळ्यात महत्त्वाचा फॉरमॅट आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटसाटी कटिबद्ध असल्याबद्दल बीसीसीआयचे आभार. खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटकडे परतत आहेत. टीममध्ये निवड होण्यासाठी ते रन बनवत आहेत. मी जेव्हा भारतात खेळत होतो, तेव्हा वनेड क्रिकेटपेक्षा हे जास्त खेळलं जायचं. तेव्हा टी-20 क्रिकेटचा जमाना नव्हता. भारत आता जगातली सर्वोत्तम टीम बनली आहे. जगातले सर्वोत्कृष्ट बॉलर आयपीएलमध्ये बॉलिंग करतात, त्यामुळे युवा खेळाडूंना त्यांचा सामना करण्याचं धैर्य मिळतं. भारतात चांगले फास्ट बॉलर तयार होत आहेत,' अशी प्रतिक्रिया शेन वॉर्नने दिली. 'घरची परिस्थिती बघता बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ऑस्ट्रेलिया जिंकेल, असं माझं मन सांगत आहे, पण डोक्याला मात्र भारत जिंकेल असं वाटत आहे. विराट फक्त एक टेस्ट मॅच खेळणार आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने विजय होईल,' अशी भविष्यवाणी शेन वॉर्नने केली. शेन वॉर्नने टेस्ट क्रिकेटमध्ये 708 विकेट घेतल्या आहेत, यातल्या 43 विकेट भारताविरुद्ध आहेत. टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शेन वॉर्न दुसऱ्या क्रमांकावर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या