Home /News /sport /

IND vs AUS : आता टेस्ट मॅचसाठीही टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल, पाहा नवा लूक

IND vs AUS : आता टेस्ट मॅचसाठीही टीम इंडियाच्या जर्सीमध्ये बदल, पाहा नवा लूक

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) टीम इंडिया रेट्रो जर्सीमध्ये मैदानात उतरली. आता टेस्ट क्रिकेटमध्येही टीम इंडियाची जर्सी बदलली आहे.

    सिडनी, 6 डिसेंबर : टी-20 मुळे क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. क्रिकेटच्या सगळ्यात छोट्या फॉरमॅटमुळे वनडे आणि टेस्टमध्येही रन बनवण्याची गती वाढली आहे, ज्यामुळे क्रिकेटचा रोमांच आणखी वाढला आहे. यातच आता टेस्ट क्रिकेटही अधिक रोमांचक करण्याचा आयसीसी आणि क्रिकेट बोर्डांचा प्रयत्न आहे. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) टीम इंडिया रेट्रो जर्सीमध्ये मैदानात उतरली. आता टेस्ट क्रिकेटमध्येही टीम इंडियाची जर्सी बदलली आहे. टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची जर्सी पांढरीच असेल, पण पुढच्या बाजूला कंपनींच्या जाहिराती असणार आहेत. टेस्ट मॅचसाठीच्या या नव्या जर्सीची झलक भारत आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यातल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यावेळी पाहायला मिळाली. टेस्ट खेळत असताना जर्सीवर स्पॉन्सरची नावं डाव्या किंवा उजव्या ठिकाणी छोट्या अक्षरात असायची. 6 महिन्यांपूर्वीच आयसीसीने काही सीरिजसाठी स्पॉन्सर लोगो वापरायला सुरुवात केली होती. आता जगातल्या सगळ्या टीम टेस्टमध्ये मोठ्या स्पॉन्सर लोगोसह मैदानात उतरतील. प्रैक्टिस मैच में नई जर्सी के साथ टॉस करते हुए कप्तान अजिंक्या रहाणे (फोटो- BCCI Twitter) कोरोना व्हायरसमुळे बऱ्याच टीमना आर्थिक नुकसान झालं आहे. टेस्ट टीमच्या जर्सीवरही मोठा स्पॉन्सर लोगो लावला तर याचा आर्थिक फायदा बोर्डाला होईल. स्पॉन्सर कंपनी मोठा लोगो वापरल्यामुळे जास्त पैसे देतील, यासाठी आयसीसीने जून महिन्यात हा निर्णय घेतला होता. याआधी जर्सीवर 64.5 चौरस सेंटिमिटर भागात जाहिरात करायची परवानगी होती, आता हाच भाग 206.45 चौरस सेंटिमिटर करण्यात आला आहे. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये आधीपासूनच मोठो लोगो दिसत होते. टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडची टीम आधीच मोठ्या लोगोसह खेळली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाने कोरोना व्हायरसनंतर एकही टेस्ट मॅच खेळली नव्हती, त्यामुळे आता या दोन्ही टीमदेखील नव्या टेस्ट जर्सीमध्ये दिसतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार टेस्ट मॅचच्या सीरिजला 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ऍडलेडमध्ये सीरिजची पहिली मॅच खेळवली जाईल. ही टेस्ट मॅच डे-नाईट असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या