मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : टीम इंडियाचा जबरा फॅन! हॉटेलमध्ये गेलेल्या खेळाडूंचं भरलं बील

IND vs AUS : टीम इंडियाचा जबरा फॅन! हॉटेलमध्ये गेलेल्या खेळाडूंचं भरलं बील

 भारतीय टीमने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) विजय मिळवत 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली. यानंतर आता सीरिजची तिसरी टेस्ट सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मेलबर्न, 2 जानेवारी : भारतीय टीमने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) विजय मिळवत 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी केली. यानंतर आता सीरिजची तिसरी टेस्ट सिडनीमध्ये 7 जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्याआधी खेळाडू मेलबर्नमध्येच सराव करत आहेत. सराव झाल्यानंतर काही खेळाडू मेलबर्नच्या बाजारात फिरत होते, यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवणही केलं.

टीम इंडियाचे चार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत (Rishabh Pant), शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) मेलबर्नच्या हॉटेलमध्ये जेवताना दिसले. टीम इंडियाच्या या खेळाडूंचं जेवणाचं बिल एका चाहत्याने दिलं. या चाहत्याने ट्विटरवर याचा एक फोटो आणि व्हिडिओदेखील शेयर केला आहे.

टीम इंडियाच्या खेळाडूंना भारतात सार्वजनिक ठिकाणी जाता येत नाही, पण परदेशामध्ये ते अनेकवेळा फिरताना दिसतात. मेलबर्नमध्येही रोहित शर्मासोबत पंत, गिल आणि नवदीप सैनी गेले. भारतीय चाहत्याने या चौघांना ओळखलं आणि स्वत: टेबलवर जाऊन त्यांचं बिल भरलं. यानंतर ऋषभ पंतने या चाहत्याचे आणि त्याच्या पत्नीचे आभार मानले.

भारतीय खेळाडूंनी हॉटेलमध्ये सॉय सॉस चिकन, चिकन मशरूम, आणि डाएट कोक घेतलं. याचं बिल 118.69 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच 6,683 रुपये झालं. या चाहत्याने खेळाडूंसमोर जास्त वेळ बसता यावं, म्हणून भूक नसतानाही खायच्या गोष्टी ऑर्डर केल्या.

First published:
top videos