मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : मागच्या 20 वर्षात 'टीम इंडिया'ने इतकेवेळा केलं 'सरेंडर'

IND vs AUS : मागच्या 20 वर्षात 'टीम इंडिया'ने इतकेवेळा केलं 'सरेंडर'

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा तिसरा दिवस भारतासाठी (India vs Australia) टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात वाईट दिवस ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा तिसरा दिवस भारतासाठी (India vs Australia) टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात वाईट दिवस ठरला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा तिसरा दिवस भारतासाठी (India vs Australia) टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात वाईट दिवस ठरला.

  • Published by:  Shreyas
ऍडलेड, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टचा तिसरा दिवस भारतासाठी (India vs Australia) टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला सगळ्यात वाईट दिवस ठरला. ऍडलेडच्या खेळपट्टीवर भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात कमी स्कोअर आहे. मागच्या 20 वर्षात भारतीय टीमने अशाचप्रकारे चारवेळा सरेंडर केलं होतं. 14 वर्षांपूर्वी 2006 साली इंग्लंडविरुद्ध मुंबई टेस्टमध्ये भारताचा फक्त 100 रनवर ऑल आऊट झाला होता. इंग्लंडचा ऑफ स्पिनर शॉन उडालने सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, युवराज सिंग यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना आऊट करत भारताचा पराभव केला. ही सीरिज 1-1 ने ड्रॉ राहिली. 2002 साली न्यूझीलंडविरुद्ध हॅमिल्टन टेस्टमध्येही भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. या मॅचमध्ये भारताचा फक्त 99 रनवर ऑल आऊट झाला. वेलिंग्टनमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय टीम 161, 121 रनवर ऑल आऊट झाली होती. यानंतर हॅमिल्टनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये भारताला 100 रनचा आकडाही पार करता आला नव्हता. या मॅचमध्ये न्यूझीलंडच्या टीमचाही 94 रनवर ऑल आऊट झाला होता, तरीही त्यांनी ही मॅच 4 विकेटने जिंकली. 2014 साली इंग्लंड दौऱ्यातही भारताची बॅटिंग पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. ओव्हलमध्ये झालेल्या या टेस्टमध्ये भारताचा 94 रनवर ऑल आऊट झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये जिमी अंडरसनने मुरली विजय, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. धोनीही शून्य रनवर आऊट झाला होता. या मॅचमध्ये भारताला 30 ओव्हरही बॅटिंग करता आली नव्हती. ही मॅच भारताने 224 रनने गमावली होती. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा तो तिसरा सगळ्यात मोठा पराभव होता. 2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद टेस्टमध्ये भारताचा 76 रनवर ऑल आऊट झाला होता, त्या मॅचमध्येही भारताने फक्त 20 ओव्हर बॅटिंग केली होती. पहिल्या इनिंगमध्ये डेल स्टेनने 23 रन देऊन 5 विकेट घेतल्या, तर एबी डिव्हिलियर्सने द्विशतक केलं होतं.
First published:

पुढील बातम्या