सिडनी, 18 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन-डे, तीन टी-20 आणि चार टेस्ट यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियानं भारताला आपल्या मायभूमीत हरवण्यासाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र त्याचबरोबर अनुभवी खेळाडूही चांगली कामगिरी करण्यास सज्ज आहे. यात आयपीएलमध्ये रिकी पॉटिंग करून टॉप ट्रेनिंग घेतलेला विकेटकीपर फलंदाज अॅलेक्स कॅरीकडून संघाला जास्त अपेक्षा आहे. आयपीएलमध्ये कॅरी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत होता.
भारताविरुद्ध होणाऱ्या तीन टी-20 मालिकेत अॅलेक्स कॅरीची संघात निवड करण्यात आली आहे. कॅरीनं आयपीएलमध्ये रिकी पॉटिंगकडून फलंदाजीचे तंत्र शिकला. याबाबत सांगताना कॅरी म्हणाला की, "मला पहिल्यांदा आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. दिल्ली कॅपिटल्समध्ये रिकी पॉटिंग आणि इतर खेळाडूंकडे खुप शिकायला मिळालं. दोन महिने खुप चांगले गेले".
वाचा-IND vs AUS : कोरोनाचं वाढतं संकट, ऑस्ट्रेलियाने खेळाडूंना सिडनीला असं पोहोचवलं
दरम्यान, आयपीएलमधील अनुभवांबाबत अॅलेक्स म्हणाला की, "गेल्या वर्षी वर्ल्ड कप दरम्यान रिकी पॉटिंगकडून खूप शिकायला मिळाले. त्याच्यासोबत चांगले संबंध झाले आहे. रिकी एक अद्भूत खेळाडू आणि शानदार कोच आहेत". दरम्यान, आयपीएलमध्ये अॅलेक्सला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानं 3 सामन्यात केवळ 32 धावा केल्या.
वाचा-भारताविरुद्ध शूज न घालता मैदानात उतरणार ऑस्ट्रेलियाचा संघ, कारण वाचून कराल सलाम
भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा
पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी
दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी
तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा
पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा
दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी
तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी
पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड
दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न
तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी
चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन