मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : स्टेडियममध्ये लागले 'मिस यू धोनी'चे बॅनर, विराटने दिली अशी प्रतिक्रिया

IND vs AUS : स्टेडियममध्ये लागले 'मिस यू धोनी'चे बॅनर, विराटने दिली अशी प्रतिक्रिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टी-20 मॅचदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) वर झालेल्या मॅचमध्ये प्रेक्षक मिस यू धोनी असं लिहिलेले बॅनर घेऊन आले होते.

  • Published by:  Shreyas

सिडनी, 8 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या टी-20 मॅचदरम्यान सिडनी क्रिकेट ग्राऊंड (SCG) वर झालेल्या मॅचमध्ये प्रेक्षक मिस यू धोनी असं लिहिलेले बॅनर घेऊन आले होते. प्रेक्षकांनी आणलेले हे बॅनर पाहून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही प्रतिक्रिया दिली. विराटची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मॅचदरम्यान फिल्डिंग करत असताना विराटने मिस यू धोनीचे हे बॅनर प्रेक्षकांच्या हातात बघितले आणि आपणही धोनीला मिस करत असल्याचा इशारा प्रेक्षकांना बघून केला.

विराट कोहली कर्णधार झाल्यानंतर नेहमीच धोनीचा सल्ला घ्यायचा. डीआरएसवेळी तर विराट धोनीने सांगितलं तरच रिव्ह्यू घ्यायचा. तसंच स्टम्प मागून धोनी स्पिनरनाही मदत करायचा, त्यामुळे धोनीच्या निवृत्तीनंतर विराटला त्याची कमी जाणवत आहे.

एमएस धोनीने यावर्षी 15 ऑगस्टला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतरही तो आयपीएलच्या 13 व्या मोसमात खेळताना दिसला. धोनीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नईची कामगिरी या मोसमात निराशाजनक झाली. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई प्ले-ऑफमध्ये पोहोचली नाही. धोनीची बॅटिंग आणि त्याचं नेतृत्वही म्हणावं तसं चमकलं नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17,266 रन करून धोनी निवृत्त झाला. यामध्ये 108 अर्धशतकं आणि 16 शतकांचा समावेश आहे. आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवल्या. कोहलीने 2017 साली पूर्णपणे भारताचं नेतृत्व स्वीकारलं. कोहलीच्या नेतृत्वात भारताने चांगली कामगिरी केली असली, तरी त्याला अजून भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देता आलेली नाही. त्यामुळे आता विराटचं लक्ष्य 2021 साली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवर असेल.

First published: