Home /News /sport /

IND vs AUS : पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला डबल धक्का, दोन खेळाडूंना दुखापत

IND vs AUS : पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला डबल धक्का, दोन खेळाडूंना दुखापत

भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) आणखी दोन धक्के बसले आहेत.

    कॅनबेरा, 5 डिसेंबर : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला (India vs Australia) आणखी एक धक्का बसला आहे. स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर एश्टन अगर (Ashton Agar)ला दुखापत झाल्यामुळे तो टी-20 सीरिजला मुकणार आहे. तिसऱ्या वनडेवेळी अगरच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. एश्टन अगरच्याऐवजी ऑफ स्पिनर नॅथन लायन याची टीममध्ये निवड झाली आहे. पहिल्या टी-20मध्ये अगरऐवजी मिचेल स्विपसन याला खेळवण्यात आलं होतं. मिचेल स्विपसनने या मॅचमध्ये विराट कोहलीची विकेट घेतली होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) यालाही दुखापत झाली आहे. पहिली टी-20 खेळतानाच फिंचला त्रास होत होता. शनिवारी आपण स्कॅनिंगसाठी जाणार असल्याचं फिंचने मॅच संपल्यानंतर सांगितलं. स्कॅनिंगचे रिपोर्ट आल्यानंतरच फिंचच्या उरलेल्या मॅचच्या सहभागाविषयी निर्णय घेण्यात येणार आहे, पण प्रथमदर्शनी त्याची दुखापत गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. मॅथ्यू वेड हा ऑस्ट्रेलियाच्या टी-20 टीमचा उपकर्णधार आहे, त्यामुळे फिंच जर उरलेल्या टी-20 खेळला नाही, तर मॅथ्यू वेडकडे नेतृत्व दिलं जाऊ शकतं. याआधी दुसऱ्या वनडेवेळी ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर याच्या मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला शेवटची वनडे आणि टी-20 सीरिजला मुकावं लागलं, तर पहिल्या वनडेवेळी मार्कस स्टॉयनिसलाही दुखापत झाली, त्यामुळे अजूनपर्यंत तो मैदानात उतरलेला नाही. पहिल्या टी-20वेळी भारताचा ऑलराऊंडर रविंद्र जडेजालाही दुखापत झाली, त्यामुळे तोदेखील उरलेल्या दोन्ही टी-20मध्ये दिसणार नाही. मॅचमध्ये बॅटिंग करत असताना जडेजाच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली, सोबतच मिचेल स्टार्कने टाकलेला बॉल जडेजाच्या हेल्मेटला लागला, त्यामुळे युझवेंद्र चहल जडेजाचा कनकशन सबस्टिट्युट म्हणून दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात आला. चहलने 3 विकेट घेत भारताला विजय मिळवून दिला. यासाठी त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या