Home /News /sport /

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रवाना

क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! टीम इंडियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी रवाना

न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी मेलबर्नमध्ये असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनीही बायो-बबलचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे.

    मेलबर्न, 04 जानेवारी : भारतात कोरोनाच्या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी DCGI कडून मंजुरी मिळाल्यानंतर भारतीयांसाठी आणखीन एक मोठी बातमी आली आहे. भारतीय संघाची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती BCCI कडून देण्यात आली आहे. भारतीय संघातील खेळाडूंची तिसऱ्या कसोटी सामन्या आधी RT-PCR tests करण्यात आली होती. त्या चाचणीमध्ये भारतीय संघातील सर्व खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. न्यू इयरचं सेलिब्रेशन करण्यासाठी मेलबर्नमध्ये असलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंनीही बायो-बबलचं उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, शुभमन गिल, नवदीप सैनी आणि पृथ्वी शॉ हे हॉटेलमध्ये जेवायला गेल्यामुळे त्यांना आता आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. बीसीसीआयने मात्र खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनंतर या खेळाडूंची 3 जानेवारीला RT-PCR Test करण्यात आली आणि त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ सिडनीमध्ये दाखल होणार असून 7 जानेवारीला तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. भारतीय संघ मेलबर्नमधून सिडनीसाठी रवाना झाला आहे. सिडनी इथे 7 जानेवारीला तिसरा कसोटी सामना पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटपटूंची कोरोना चाचणी करण्यात आली होती आणि ती निगेटिव्ह आल्यानं दिलासा मिळाला आहे.
    First published:

    Tags: Breaking News, India vs Australia, Rohit sharma

    पुढील बातम्या