मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : शॉ-गिलऐवजी या खेळाडूने ओपनिंगला यावं, गावसकरांचा सल्ला

IND vs AUS : शॉ-गिलऐवजी या खेळाडूने ओपनिंगला यावं, गावसकरांचा सल्ला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. यानंतर सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिला आहे.

    ऍडलेड, 21 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमला फक्त 36 रन करता आले. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निचांकी स्कोअर आहे. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याचा खराब फॉर्म आणि विराट कोहली भारतात परतल्यामुळे टीमच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाला मेलबर्नमध्ये पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा सल्ला दिला आहे. 'स्पोर्ट्स तक'सोबत बोलताना गावसकर म्हणाले, 'मेलबर्न टेस्टमध्ये भारताला चांगली सुरूवात करावी लागेल. सकारात्मक दृष्टीकोन घेऊन भारताने मैदानात उतरलं पाहिजे. ऑस्ट्रेलियाची बॅटिंग कमकुवत आहे. भारताने जर सकारात्मक विचार ठेवला नाही तर सीरिज 4-0 ने गमवावी लागेल. पण जर ते सकारात्मक राहिले, तर पुनरागमन करू शकतात. या खराब कामगिरीनंतर राग येणं स्वाभाविक आहे, पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं.' खराब फिल्डिंगमुळे गमावली मॅच भारताने खराब फिल्डिंग आणि चुकीच्या ठिकाणी फिल्डिंग लावल्यामुळे ऑस्ट्रेलियाला फायदा झाला. जर भारताने फिल्डिंगमध्ये चुका केल्या नसत्या, तर त्यांच्याकडे 100 रनपेक्षा जास्तची आघाडी असती, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. टीममध्ये दोन बदल गावसकर यांनी भारतीय टीममध्ये दोन बदल करण्याची गरज बोलून दाखवली. मेलबर्न टेस्टमध्ये ओपनर म्हणून पृथ्वी शॉऐवजी केएल राहुल (KL Rahul) ने ओपनिंगला यावं, तर पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर शुभमन गिल (Shubhaman Gill) याने बॅटिंग करावी. जर भारताची सुरुवात चांगली झाली, तर गोष्टी बदलू शकतात, असं मत गावसकरांनी मांडलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या