IND vs AUS : अश्विनसमोर गुडघे टेकल्यानंतर स्मिथ म्हणतो...

IND vs AUS : अश्विनसमोर गुडघे टेकल्यानंतर स्मिथ म्हणतो...

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये आर.अश्विन (R.Ashwin) याने रोखलं.

  • Share this:

मेलबर्न, 30 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याला पहिल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये आर.अश्विन (R.Ashwin) याने रोखलं. अश्विनने स्मिथला पहिल्या टेस्टमध्ये 1 रनवर आणि दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शून्य रनवर आऊट केलं. स्मिथ दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताच्या बॉलिंगपुढे संघर्ष करताना दिसला. 4 इनिंगमध्ये स्मिथला फक्त 10 रन करता आले. मेलबर्नमध्ये भारताकडून 8 विकेटने पराभव स्वीकारल्यानंतर स्मिथने प्रतिक्रिया दिली आहे. मी अश्विनला माझ्यावर वरचढ ठरण्याची संधी दिली, कारकिर्दीमध्ये मी दुसऱ्या कोणत्याही स्पिनरला असं करून दिलं नाही, असं स्मिथ म्हणाला.

स्टीव्ह स्मिथ सेन रेडियोसोबत बातचित करत होता. अश्विनला मी इतका चांगला खेळलो नाही, जेवढं खेळण्याची गरज होती. मला अश्विनवर दबाव टाकायला हवा होता, असं वक्तव्य स्मिथने केलं.

'मला आत्मविश्वासाने माझा स्वाभाविक खेळ खेळावा लागेल. मी क्रीजवर टिकून खेळू इच्छितो, ज्याची गरज आहे. यावर्षी मी फक्त 64 बॉलची सगळ्यात मोठी खेळी केली आहे, जी वनडेमधली होती. नेटमध्ये तुम्ही कितीही सराव करा, पण मैदानातली गोष्ट वेगळी असते. मी मैदानात लय मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहे. हे एवढं सोपं नाही, जर समोरच्या टीमकडे उत्कृष्ट बॉलर असतील,' असं वक्तव्य स्मिथने केलं.

मेलबर्नमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला. याचसोबत भारताने 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये पुनरागमन केलं. सध्या ही सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. सीरिजची तिसरी टेस्ट 7 जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे.

Published by: Shreyas
First published: December 30, 2020, 12:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या