मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : या खेळाडूमुळे ऑस्ट्रेलियात केली चांगली कामगिरी, शुभमन गिलचा खुलासा

IND vs AUS : या खेळाडूमुळे ऑस्ट्रेलियात केली चांगली कामगिरी, शुभमन गिलचा खुलासा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने (India vs Australia) टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. याचसोबत या दौऱ्यात भारताला काही स्टार खेळाडूही मिळाले, यातलाच एक खेळाडू म्हणजे शुभमन गिल(Shubhaman Gill).

  • Published by:  Shreyas
मुंबई, 24 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने (India vs Australia) टेस्ट सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. याचसोबत या दौऱ्यात भारताला काही स्टार खेळाडूही मिळाले, यातलाच एक खेळाडू म्हणजे शुभमन गिल(Shubhaman Gill). मेलबर्नच्या मॅचमधून शुभमन गिलने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर त्याने 6 इनिंगमध्ये 51.8 च्या सरासरीने 259 रन केले. ब्रिस्बेन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये गिलने 91 रनची जबरदस्त खेळी केली. गिलने स्टार्क, कमिन्स आणि हेजलवूड यांच्यासारख्या दिग्गज बॉलरवरही आक्रमण केलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतलेल्या शुभमन गिलने त्याच्या या यशस्वी दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी युवराज सिंग (Yuvraj Singh) सोबत केलेला सराव कामाला आल्याचं शुभमन गिल म्हणाला. टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना शुभमन गिल म्हणाला, 'आयपीएल आधी मी युवराज सिंगसोबत खूप वेळ प्रॅक्टिस कॅम्पमध्ये घालवला. कॅम्पमध्ये युवराजने मला शॉर्ट बॉल खेळण्याचा सराव दिला. युवराजने स्वत: मला शेकडो शॉर्ट बॉल टाकले, ज्याचा फायदा मला झाला.' 'ब्रिस्बेनमधल्या खेळीमुळे मी संतुष्ट आहे, पण शतक झालं असतं तर आणखी आनंद झाला असता. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मी थोडा नर्व्हस होतो. शतक करता आलं नसलं तरी टीमच्या विजयात योगदान दिलं, म्हणून खूश आहे. या सीरिजमुळे मला खूप काही शिकायला मिळालं,' अशी प्रतिक्रिया गिलने दिली.
First published:

पुढील बातम्या