मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : दुसऱ्याच टेस्टमध्ये शुभमन गिलचं अर्धशतक, 'हा' रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय

IND vs AUS : दुसऱ्याच टेस्टमध्ये शुभमन गिलचं अर्धशतक, 'हा' रेकॉर्ड करणारा चौथा भारतीय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताच्या (India vs Australia) ओपनरनी चांगली सुरूवात करून दिली. सिडनी टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा 338 रनवर ऑल आऊट केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) हे दोन ओपनर मैदानात उतरले.

पुढे वाचा ...

सिडनी, 8 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताच्या (India vs Australia) ओपनरनी चांगली सुरूवात करून दिली. सिडनी टेस्ट मॅचच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा 338 रनवर ऑल आऊट केल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) हे दोन ओपनर मैदानात उतरले. या दोघांनीही 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. आपली दुसरीच टेस्ट खेळणाऱ्या शुभमन गिलने अर्धशतक पूर्ण केलं. 101 बॉलमध्ये 50 रन करून शुभमन गिल आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 8 फोरचा समावेश होता.

आपल्या दुसऱ्याच टेस्टमध्ये अर्धशतक करणाऱ्या शुभमन गिलने स्वत:च्या नावावर खास विक्रम केला आहे. सगळ्यात लहान वयात आशिया खंडाबाहेर अर्धशतक करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत गिल चौथ्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल याने 21 वर्ष आणि 122 दिवसांचा असताना हे अर्धशतक झळकावलं आहे.

आशिया खंडाबाहेर सगळ्यात लहान वयात अर्धशतकापेक्षा जास्तचा स्कोअर करण्याचा विक्रम टीम इंडियाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या नावावर आहे. रवी शास्त्री यांनी 20 वर्ष आणि 44 दिवसांचे असताना 1982 साली इंग्लंडविरुद्ध अर्धशतकापेक्षा जास्तचा स्कोअर केला होता.

या यादीमध्ये माधव आपटे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. माधव आपटे यांनी 20 वर्ष 108 दिवसांचे असताना वेस्ट इंडिजविरुद्ध 1952-53 साली अर्धशतक केलं. या दौऱ्यामध्ये माधव आपटे यांनी चार 50 पेक्षा जास्त स्कोअर केले होते. पृथ्वी शॉ याने न्यूझीलंडमध्ये 2019-20 साली 20 वर्ष 112 दिवसांचा असताना अर्धशतक केलं होतं. त्यानंतर आता शुभमन गिलने ऑस्ट्रेलियामध्ये अर्धशतक केलं आहे.

First published: