India vs Australia : रोहितच्या जागी 'या' मुंबईकर खेळाडूला मिळणार कसोटी संघात जागा, विराटचा आहे खास

India vs Australia : रोहितच्या जागी 'या' मुंबईकर खेळाडूला मिळणार कसोटी संघात जागा, विराटचा आहे खास

रोहित शर्मा आणि इशांत शर्मा अद्याप फिट नसल्यामुळे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सिडनी, 24 नोव्हेंबर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 27 नोव्हेंबरपासून तीन एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर तीन टी-20 आणि चार कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेआधी भारताचे दोन अनुभवी खेळाडू मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा अद्याप फिट नसल्यामुळे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध 17 डिसेंबरपासून होणाऱ्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या जागी श्रेयस अय्यरला राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात येणार आहे.

श्रेयस अय्यर सध्या ऑस्ट्रेलियातच असून त्याची एकदिवसीय आणि टी-20 संघात निवड झाली आहे. अय्यरला कसोटी संघात स्थान मिळाले नव्हते, मात्र रोहित शर्मा या मालिकेला मुकल्यास श्रेयस अय्यरची वर्णी लागू शकते. दरम्यान इशांत शर्माच्या जागी कोणता खेळाडू संघात येईल, याबाबत अद्याप माहिती नाही आहे. अय्यरनं नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाला फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र रोहितच्या मुंबईकडून दिल्लीचा पराभव झाला.

वाचा-IPL खेळणं रोहित शर्माला पडणार महागात, 'या' कारणामुळे कसोटी मालिकेला मुकणार?

या कारणामुळे रोहित शर्मा कसोटी मालिकेला मुकणार

आयपीएल (IPL 2020) दरम्यान मुंबई (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा आणि दिल्ली (Delhi Capitals) चा जलद गोलंदाजइशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे इशांत शर्मा आयपीएलमधून बाहेर झाला होता, तर रोहित चार सामन्यात विश्रांती घेऊन पुन्हा खेळला होता. या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती, पण नंतर वाद झाल्यावर रोहितला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं. मात्र आता रोहित 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी दौऱ्यासाठी फिट होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, रोहितच्या फिटनेसविषयी अद्याप बीसीसीआयला कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. तर इशांत शर्माची दुखापत अजूनही बरी झाली नसल्याचं समोर आलं आहे.

वाचा-जागा 1 फलंदाज 3! ऑस्ट्रेलियावरुद्ध शिखर धवनसोबत कोणाला उतरवणार विराट?

भारताचा सध्याचा कसोटी संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुभमन गिल, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर. अश्विन आणि मोहम्मद सिराज.

Published by: Priyanka Gawde
First published: November 24, 2020, 12:41 PM IST

ताज्या बातम्या