मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND VS AUS: टीम इंडियाने ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारलं : कोण करतं असं कौतुक!

IND VS AUS: टीम इंडियाने ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारलं : कोण करतं असं कौतुक!

विराट कोहली (Virat Kohli) आणि शमीच्या (Mohammad Shami)  अनुपस्थितीतही भारताने सामना जिंकला आणि अनेकांची तोंडं बंद झाली आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) आणि शमीच्या (Mohammad Shami) अनुपस्थितीतही भारताने सामना जिंकला आणि अनेकांची तोंडं बंद झाली आहेत.

विराट कोहली (Virat Kohli) आणि शमीच्या (Mohammad Shami) अनुपस्थितीतही भारताने सामना जिंकला आणि अनेकांची तोंडं बंद झाली आहेत.

    नवी दिल्ली, 30 डिसेंबर: पहिल्या टेस्टमधील दारुण पराभवनंतर(Ind vs Aus) इंडियन टीमने फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेत दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने पराभव केला. विराट कोहली(Virat Kohli) आणि शमीच्या(Mohammad Shami) अनुपस्थितीत इंडियन टीमने चांगली कामगिरी केल्यानं अनेकांची तोंड बंद झाली आहेत. या मॅचमध्ये अँक्टिंग कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कॅप्टन्सीचे देखील कौतुक होताना दिसत आहेत. अनेक आजी माजी प्लेअर इंडियन टीमचे कौतुक करत आहेत. यामध्ये पाकिस्तानचा माजी प्लेअर शोऐब अख्तर(Shoaib Akhtar) याने इंडियन टीमचे कौतुक करताना काय उपमा दिली आहे पाहा. भारताने ऑस्ट्रलियाची चांगलीच खरडपट्टी काढली आहे, असं अख्तर म्हणतो. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या दारुण पराभवांनंतर इंडियन टीमनं ऑस्ट्रलियाला पोत्यात घालून मारल्यासारखं हरवलं, असं अख्तर म्हणाला. याचबरोबर जडेजाची (Ravindr Jadeja) ऑलराउंड कामगिरी, सिराज(Mohammad Siraj) आणि शुभमन गिलच्या(Shubman Gill) यशस्वी पदार्पणावरही शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. IND vs AUS : भारताच्या विजयानंतर अश्विनच्या पत्नीने नवऱ्याबद्दल केला खुलासा या मॅचमध्ये इंडियन टीममध्ये उत्तम कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला धडा शिकवल्याचं त्यानं आपल्या युट्युब चॅनेलमध्ये बोलताना म्हटलं. ऑस्ट्रेलियावर टीका करण्याबरोबरच त्याने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्या कॅप्टन्सीचे देखील कौतुक केलं. रहाणे याने अतिशय शांततेत आपले काम केलं आहे. ‘रहाणेने शांततेत नेतृत्व केलं. एकदम शांतपणे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात बदल केला. शांततेत नेतृत्व करणाऱ्या रहाणेच्या(Ajinkya Rahane) नेतृत्वचा जागतिक क्रिकेटमध्ये डंका वाजत असल्याचे देखील अख्तर याने यावेळी म्हटलं. या पराभवामुळं ऑस्ट्रेलियन टीम सध्या दबावात आहे. त्यामुळे इंडियन टीमकडे सिरीज जिंकण्याची चांगली संधी असल्याचे देखील रावळपिंडी एक्सप्रेसने म्हटलं. इंडियन टीमची बेंच स्ट्रेंथ देखील कमाल असल्याचं त्यानं म्हटलं. विराट कोहली, मोहम्मद शमी आणि शर्माच्या अनुपस्थितीत इंडियन टीमने मिळवलेला विजय खास असल्याचं त्यानं यावेळी म्हटले. भारताच्या आणखी एका क्रिकेटपटूचा भाजपमध्ये प्रवेश शुभमन गिल आणि सिराजचे कौतुक इंडियन टीमचे कौतुक करण्याबरोबरच रावळपिंडी एक्स्प्रेसने यावेळी युवा बॅट्समन शुभमन गिल आणि सिराजचे देखील कौतुक केलं. या मॅचमध्ये गिलने दोन्ही इनिंगमध्ये महत्त्वाची खेळी करत इंडियन टीमला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे दोन्ही खेळाडू इंडियन टिममधील पुढील स्टार असल्याचं त्यानं म्हटलं. त्याचबरोबर सिराज याने आपल्या चांगल्या कामगिरीने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिल्याने देखील अख्तरने म्हटलं. सिराजने या मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या तर गिलने दोन्ही इनिंगमध्ये मिळून महत्त्वपूर्ण 80 रन बनवले.
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या