मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs AUS : टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, शोएब अख्तरने या दोन भारतीयांना दिलं श्रेय

IND vs AUS : टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय, शोएब अख्तरने या दोन भारतीयांना दिलं श्रेय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) ऐतिहासिक विजय झाला. याचसोबत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2-1 ने जिंकली. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा देखील प्रभावित झाला आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) ऐतिहासिक विजय झाला. याचसोबत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2-1 ने जिंकली. या सीरिजमध्ये भारतीय टीमच्या अनेक तरुण खेळाडूंनी आपल्या शानदार कामगिरीच्या बळावर विजय मिळवून दिला. या विजयानंतर पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हा देखील प्रभावित झाला आहे. या विजयाबद्दल त्याने टीम इंडियाचे अभिनंदन केलं आहे. या विजयाचे श्रेय शोएबने राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना दिले आहे.

  शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने आपल्या युट्युब चॅनेलवरून हे मत मांडले आहे. त्याने यामध्ये इंडियन टीम आणि व्यवस्थापनाचे कौतुक केलं आहे. यावेळी बोलताना त्याने ब्रिस्बेनमधील विजयाचे मुख्य कारण भारतीय टीम व्यवस्थापन आणि बीसीसीआयने (BCCI) मागील 20 वर्षात केलेल्या सुधारणा आहेत, असं सांगितलं.

  याचसोबत या विजयाला आयपीएलही जबाबदार असल्याचं शोएब म्हणाला. आयपीएलमध्ये तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर खेळायला मिळाल्याने त्यांना फायदा होत असल्याचं शोएब अख्तर याला वाटत आहे. पण त्याने या सगळ्याचे मुख्य श्रेय हे राहुल द्रविड आणि रवी शास्त्री यांना दिले.

  ज्या पद्धतीने राहुल द्रविड याने तरुण खेळाडूंना प्रशिक्षित केले आणि रवी शास्त्री यांनी त्यांना संधी देत त्यांचे मनोबल वाढवले ते कौतुकास्पद असल्याचे शोएब अख्तर यावेळी म्हणाला. राहुल द्रविड हा भारताचा सगळ्यात शानदार टेस्ट खेळाडू असल्याचंही शोएबने म्हटलं.

  द्रविडकडे सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे प्रमुखपद असून याठिकाणी तरुण खेळाडूंना ट्रेन करण्याचे काम द्रविड करतो. राहुल द्रविडने अंडर -19 खेळाडूंना तयार केल्यानेच आज त्यांनी ऑस्ट्रेलियामध्ये इतिहास रचल्याचे अख्तर म्हणाला. या सर्व तरुण खेळाडूंना राहुलने उत्तम ट्रेन केल्यानेच आज भारतीय टीमने ही कामगिरी केल्याची प्रतिक्रिया शोएबने दिली.

  याचबरोबर वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, सिराज, गिल, पंत, मयंक अग्रवाल या खेळाडूंनी आपल्या आजूबाजूला काय होत आहे, याकडे लक्ष न देता केवळ आपल्या खेळाकडे लक्ष दिल्याने शानदार कामगिरी करणे शक्य झाले, असं वक्तव्य शोएबने केलं.

  रवी शास्त्री यांनी त्यांच्यात दाखवलेल्या विश्वासामुळे देखील हे शक्य झाल्याचं वक्तव्य शोएबने केलं. दरम्यान, या दौऱ्यात शानदार कामगिरी करणाऱ्या ऋषभ पंत(Rishabh Pant) याला शोएबने न घाबरणारा क्रिकेटपटू म्हणलं आहे. याचबरोबर व्यवस्थापन आणि ड्रेसिंग रूम देखील खेळाडूंच्या कामगिरीत भर घालण्यासाठी फायदेशीर असल्याचं शोएब अख्तर म्हणाला.

  First published:
  top videos