शरद पवारांची मध्यस्थी, नाहीतर खेळाडूंनी मिस केली असती इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट

शरद पवारांची मध्यस्थी, नाहीतर खेळाडूंनी मिस केली असती इंग्लंडविरुद्धची पहिली टेस्ट

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून भारतीय टीम (India vs Australia) भारतात परतली आहे. आज सकाळी मुंबई विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतात परतणाऱ्या या क्रिकेटपटूंना दिलासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवून भारतीय टीम (India vs Australia) भारतात परतली आहे. आज सकाळी मुंबई विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतात परतणाऱ्या या क्रिकेटपटूंना दिलासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य असलेल्या शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane), रोहित शर्मा (Rohit Sharma), रवी शास्त्री (Ravi Shastri), शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) हे मुंबईकर खेळाडू दुबईमार्गे ऑस्ट्रेलियातून परतले. मुंबई महापालिकेच्या नियमांनुसार या खेळाडूंना 15 दिवस क्वारंटाईन व्हावं लागलं असतं, पण पवारांनी मध्यस्थी केल्यामुळे या खेळाडूंना दिलासा मिळाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

रात्री उशीरापर्यंत शरद पवारांनी मुंबई मनपा अधिकारी आणि राज्य शासनाच्या वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांसोबत बोलून चर्चा केली आणि यातून तोडगा काढल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुंबईमध्ये परतल्यानंतर खेळाडूंना क्वारंटाईनची नियमावली लावणार का? याबाबत गोंधळ सुरू होता. पण शरद पवारांनी राज्य शासन आणि मुंबई महापालिका यांच्यात समन्वय केल्याची माहिती एमसीएच्या एका वरिष्ठ सदस्याने दिली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून परतलेल्या मुंबईतल्या खेळाडूंना क्वारंटाऊईन व्हावं लागणार नाही.

काल ऑस्ट्रेलियावरून निघालेले भारतीय खेळाडू दुबईमार्गे मुंबईमध्ये दाखल झाले. दुबईवरून येत असले तरी त्यांना क्वारंटाईनच्या नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्यामुळे युरोप, दक्षिण आफ्रिका आणि मध्य-पूर्व देशांमधून येणाऱ्या नागरिकांसाठी कठोर नियम करण्यात आले आहेत. या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि 7 दिवस घरीच क्वारंटाईन व्हावं लागतं.

भारतीय खेळाडूंना मुंबईमध्ये क्वारंटाईन व्हावं लागलं असतं तर त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सहभागी होता आलं नसतं, कारण 5 फेब्रुवारीपर्यंत त्यांना क्वारंटाईन व्हावं लागलं असतं. भारत आणि इंग्लंड यांच्यातली टेस्ट सीरिजही 5 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यासाठी भारतीय टीम 27 जानेवारीला बायो-बबलमध्ये जाणार आहे.

Published by: Shreyas
First published: January 21, 2021, 11:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या