सिडनी, 9 जानेवारी : ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न (Shane Warne) आणि एन्ड्रयू सायमंड्स (Andrew Symonds) कायमच वादात राहिले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतल्यानंतरही या दोन्ही खेळाडूंबाबतचा वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. यावेळी वॉर्न आणि सायमंड्स यांनी लाबुशेन (Marnus Labuschagne) बद्दल अपशब्द उच्चारले. कॉमेंट्री करत असताना या दोघांनी लाबुशेनला शिवी दिली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळे दोघांवरही टीका करण्यात येत आहे. या प्रकरणावरून आता प्रसारणकर्ता कायो स्पोर्ट्सने माफी मागितली आहे.
बिग बॅश लीग (BBL) मध्ये एडलेड स्ट्रायकर्स आणि मेलबर्न रेनेगेड्स यांच्यातल्या मॅचआधी वॉर्न आणि सायमंड्स लाबुशेनच्या बॅटिंगवर चर्चा करत होते. या दोघांमध्ये सुरू असलेली वैयक्तिक चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली. वॉर्नने लाबुशेनला बॅटिंगचा सल्ला देत असताना अपशब्द वापरले. तसंच दोन्ही खेळाडू लाबुशेनच्या बॅटिंगवर संतापलेही होते.
Ahh Kayo, thank you for this pic.twitter.com/Jy6PfTpvYK
— Lenny Phillips (@lenphil29) January 8, 2021
लाबुशेनने भारताविरुद्धच्या (India vs Australia) तिसऱ्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली असली तरीही त्याच्यावर वॉर्न आणि सायमंड्सनी घाणेरड्या शब्दांमध्ये टीका केली. सिडनी टेस्टमध्ये लाबुशेन 91 रनवर आऊट झाला. त्याने पुकोवस्की आणि स्मिथसोबत शतकीय पार्टनरशीपही केली.
प्रसारणकर्त्या कियो स्पोर्ट्सने या वादानंतर माफीही मागितली आहे. आमची लाईव्ह स्ट्रीमिंग वेळेआधीच सुरू झाली आणि आम्ही काही स्वीकार करता येणार नाहीत, असे शब्द ऐकले. कायो स्पोर्ट्स आणि आमची टीम कोणतंही स्पष्टीकरण न मागता माफी मागतो, असं कायो स्पोर्ट्सने सांगितलं.
याआधी बॉर्डर-गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीच्या पहिल्या मॅचमध्ये वॉर्न वादात सापडला होता. त्याने चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) चा उल्लेख स्टीव्ह असा केला होता. फॉक्स क्रिकेटसाठी कॉमेंट्री करताना यॉर्कशायरसोबत काऊंटी खेळत असताना तिथले सहकारी पुजाराला स्टीव्ह म्हणायचे, असं वॉर्न हसत म्हणाला. पुजारा आशियाई खेळाडू असल्याने आणि त्याच्या कातडीचा रंग पाहून त्याला ‘स्टीव्ह’ अशी हाक मारली जात असे, असा दावा यॉर्करशायरच्या माजी कर्मचाऱ्यानं काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावेळीही शेन वॉर्नने माफी मागावी, अशी मागणी सोशल मीडियावरून करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.