Home /News /sport /

IND vs AUS : पहिल्या टेस्टमधल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का

IND vs AUS : पहिल्या टेस्टमधल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताला आणखी एक धक्का

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) लाजीरवाणा पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

    ऍडलेड, 19 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) लाजीरवाणा पराभव झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची इनिंग 21.2 ओव्हरमध्ये फक्त 36 रनवर संपुष्टात आली. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील भारताचा हा सगळ्यात कमी स्कोअर आहे. पहिल्या टेस्ट मधल्या या पराभवासोबतच भारतीय टीमला आणखी एक धक्का बसला आहे. फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammad Shami) हा उरलेल्या तीन टेस्ट मॅच खेळणार नाही, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. शनिवारी दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मोहम्मद शमीच्या मनगटाला बॉल लागला. बॉल लागल्यानंतर शमीला खांदाही उचलता येत नव्हता. पॅट कमिन्सचा उसळलेला बॉल शमीच्या हाताला लागला, यानंतर शमी मैदान सोडून गेला, त्यामुळे भारताची इनिंग 36 रनवरच आटोपली. 'मोहम्मद शमीला गंभीर दुखापत झाली असून उर्वरित कसोटी सामन्यांमध्ये त्याला खेळवण्याची शक्यता मावळली आहे,' अशी माहिती बीसीसीआय सूत्रांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. ईशांत शर्मा दुखापतीमुळे आधीच या दौऱ्याला मुकला आहे, त्यात मोहम्मद शमी टेस्ट सीरिजमधून बाहेर झाला, तर तो भारतासाठी मोठा धक्का असेल. कारण मागच्या दोन वर्षात तो भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट बॉलर आहे. शमी खेळला नाही, तर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) किंवा नवदीप सैनी (Navdeep Saini) यांना पदार्पणाची संधी मिळू शकते. विराट भारतात परतणार पहिल्या टेस्ट मॅचनंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे विराट दौरा अर्धवट सोडणार आहे. तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे, पण 14 दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण होत नसल्यामुळे तोदेखील दुसरी टेस्ट खेळू शकणार नाही. तिसऱ्या टेस्टसाठी फिटनेस टेस्ट पास झाला तर रोहित खेळू शकेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी टेस्ट 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. चार टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारत 1-0 ने पिछाडीवर पडला आहे. उरलेल्या तिन्ही टेस्ट मॅचचं नेतृत्व अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) करणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या