मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

पिछली बार क्या बोला था? असं विचारत माजी क्रिकेटर वासीम जाफरने घेतली वॅानची विकेट

पिछली बार क्या बोला था? असं विचारत माजी क्रिकेटर वासीम जाफरने घेतली वॅानची विकेट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. पण त्यासाठी इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) का होतोय ट्रोल?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. पण त्यासाठी इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) का होतोय ट्रोल?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारत जिंकला. पण त्यासाठी इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) का होतोय ट्रोल?

    मेलबर्न, 30 डिसेंबर : IND Vs Aus च्या पहिल्या टेस्ट मॅचमधील दारुण पराभवानंतर इंडियन टीमने (India) जबरदस्त कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला(Australia) दुसऱ्या मॅचमध्ये 8 विकेट्सने पराभूत केलं. यानंतर इंडियन टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. विराट कोहली(Virat Kohli) आणि मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत इंडियन टीमने ऑस्ट्रेलियाला हारवल्याने सोशल मीडियावर देखील इंडियन टीमचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी इंडियन टीम या टेस्ट सिरीजमध्ये 4-0 अशी पराभूत होणार असल्याची भविष्यवाणी करणाऱ्या इंग्लडच्या मायकल वॉनला(Michael Vaughan) देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये इंडियन टीम दुसऱ्या इनिंगमध्ये 36 रनवर ऑलआउट झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन मायकल वॉन (Michael Vaughan) याने इंडियन टीमला कमजोर समजत मोठी टीका केली होती. यावेळी त्याने इंडियन टीम ही टेस्ट सिरीज 4-0 अशी हरणार असल्याचे म्हटलं होतं. या टेस्टमध्ये मोहम्मद शमी याच्या हाताला दुखापत झाल्यानं तो सिरीजमधून बाहेर पडला. त्यानंतर कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) देखील आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी भारतात परतल्याने इंडियन टीम कमजोर दिसत होती. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि कोणताही प्रमुख बॉलर नसल्याने या सिरीजमध्ये इंडियन टीमला कमबॅकची संधी नसल्याचे वॉन म्हणाला होता. पण इंडियन टीमने दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये उत्तम कामगिरी केल्याने आता वॉनला चांगलेच ट्रोल केलं जात आहे. रोहित शर्मा(Rohit Sharma) इंडियन टीममध्ये परतला असून तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये तो खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मॅगझिनमध्ये होती इंटर्न, आता बॉलिवूड टॉप अभिनेत्रींमध्ये सामिल वासीम जाफर ट्विटरवर ॲक्टिव्ह असतो. त्याचं हे जबरदस्त मीम व्हायरल होत आहे ट्विटरवर उडवली जात आहे खिल्ली इंडियन टीमच्या या विजयानंतर वॉनचे(Michael Vaughan) हे जुने ट्विट कोट करून अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत. यामध्ये विविध मिम्स व्हायरल होत आहेत. यापूर्वी देखील त्याने इंडियन टीमच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भाष्य केलं होतं. या दौऱ्यावर इंडियन टीम तिन्ही फॉरमॅटमध्ये हरणार असल्याचे त्याने म्हटलं होतं. पण इंडियन टीमने वनडे मालिकेत 2-1 ने पराभूत झाल्यानंतर टी-20 सिरीजमध्ये 2-1 ने विजय मिळवला होता. त्यामुळं चाहत्यांनी त्याला चांगलाच धारेवर धरलं असून ट्विटरवर त्याला फैलावर घेतलं जात आहे. 80 फूट उंचावर बाल्कनीच्या रेलिंगवर तरुणी करत होती योगा; पाय घसरला आणि... याचबरोबर अनेक जुन्या प्लेअरनी देखील इंडियन टीमच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले होते. परंतु दुसऱ्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला धूळ चारल्यानंतर आता 7 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवून इंडियन टीम सिरीज जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
    First published:

    Tags: India vs Australia

    पुढील बातम्या