Home /News /sport /

India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेट्रो लूकमध्ये दिसणार भारतीय संघ, धवननं शेअर केला जर्सीचा पहिला PHOTO

India vs Australia : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेट्रो लूकमध्ये दिसणार भारतीय संघ, धवननं शेअर केला जर्सीचा पहिला PHOTO

टीम इंडिया 90च्या दशकातली जर्सी घालून मैदानात उतरणार, पाहा संघाचा रेट्रो लूक.

    सिडनी, 24 नोव्हेंबर : तब्बल 8 महिन्यांनंतर भारतीय संघ पहिला आंतरराष्ट्रीय दौरा करणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय, तीन टी-20 आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होईल. तर दुसरी वनडे 29 नोव्हेंबरला, तिसरी वनडे 2 डिसेंबरला होईल. यानंतर 4 डिसेंबरला पहिली टी-20, 6 डिसेंबरला दुसरी टी-20 आणि 8 डिसेंबरला तिसरी टी-20 खेळवली जाईल. दरम्यान, या मालिकेत टीम इंडिया वेगळ्या रुपात दिसणार आहे. टीम इंडिया या मालिकेत वेगळ्या जर्सीमध्ये दिसणार आहे. टीम इंडियाच्या नव्या जर्सीचा फोटो भारताचा स्टार फलंदाज शिखर धवननं पोस्ट केला आहे. यामध्ये टीम इंडिया रेट्रो लूकमध्ये मैदानात उतरताना दिसणार आहे. भारताच्या या नव्या जर्सीचा रंग 80च्या दशकातील जर्सीसारखा आहे. ही जर्सी निळ्या नाही तर नेव्ही ब्लू रंगाची आहे. 1992च्या वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघानं अशाच प्रकारची जर्सी परिधान केली होती. वाचा-IPL खेळणं रोहित शर्माला पडणार महागात, 'या' कारणामुळे कसोटी मालिकेला मुकणार वाचा-37 वर्षांनंतर भारत पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचणार 'तो' विक्रम टीम इंडियाचा किट स्पॉन्सर बदलला अलीकडेच टीम इंडियाला एक नवीन किट स्पॉन्सर मिळाला आहे. टीम इंडियाचा किट प्रायोजक आता ऑनलाइन गेम कंपनी MPL आहे. यापूर्वी टीम इंडियाचा किट प्रायोजक Nike कंपनी होती. बीसीसीआयने Nikeबरोबर पाच वर्षांचा करार केला. आता MPL प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला 65 लाख रुपये देईल. वाचा-जागा 1 फलंदाज 3! ऑस्ट्रेलियावरुद्ध शिखर धवनसोबत कोणाला उतरवणार विराट? भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: India vs Australia, Team india

    पुढील बातम्या