• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • India vs Australia : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी, या दिवशी होणार डे-नाइट टेस्ट

India vs Australia : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक जारी, या दिवशी होणार डे-नाइट टेस्ट

या दौऱ्यात भारत चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : अखेर डिसेंबरमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India vs Australia tour) जाणार आहे. कोरोना काळात भारतानं एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नव्हता. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) भारतीय खेळाडू खेळत आहेत. यानंतर भारत ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. बीसीसीआयनं याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. आता या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात डे-नाइट टेस्ट मॅचही होणार आहे. या दौऱ्यात भारत चार कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होईल. 27, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी तीन एकदिवसीय सामने खेळले जातील. तर, डिसेंबर 4,6 आणि 8 रोजी तीन टी-20 सामने होतील. त्यानंतर पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून सुरू होईल. मेलबर्नमध्ये दोन्ही संघ बॉक्सिंग डे कसोटी मॅच खेळतील. वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळाडू कुटुंबाला घेऊन जाणार? गांगुलीचे मोठे वक्तव्य इंडिया ए करणार ऑस्ट्रेलिया दौरा कसोटी मालिकेनंतर इंडिया ए टीमही ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दरम्यान दोन्ही संघांमध्ये 11 ते 13 डिसेंबरमध्ये डे-नाइट टेस्ट मॅच सिडनीमध्ये होणार आहे. यासाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आली नाही आहे. 10 नोव्हेंबर रोजी आयपीएल संपल्यानंतर सर्व संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील. वाचा-ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, जखमी रोहित शर्मा संघाबाहेर भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
  Published by:Priyanka Gawde
  First published: