India vs Australia : ...तरच रोहित-इशांत खेळू शकतात कसोटी मालिका, निर्णय आता ऑस्ट्रेलियाच्या हाती

India vs Australia : ...तरच रोहित-इशांत खेळू शकतात कसोटी मालिका, निर्णय आता ऑस्ट्रेलियाच्या हाती

रोहित-इशांतबाबत मोठी अपडेट! BCCI नाही तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड घेणार दोघांबाबत निर्णय.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया दौरा (India vs Australia) 27 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, या दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिले दोन कसोटी सामने खेळू शकणार नाही आहेत. दरम्यान उर्वरित सामने खेळू शकणार की नाही, हा निर्णय आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (CA) हाती आहे. बीसीसीआय सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संवाद साधत आहे.

रोहित आणि इशांत भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना झाले नव्हेत. दोघंही नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिटनसेवर काम करत होते. दरम्यान NCAच्या रिपोर्टनुसार रोहित आणि इशांत यांना फिट होण्यासाठी एका महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्यानंतर दोघांना 14 दिवस क्वारंटाइनही रहावे लागेल. दरम्यान, आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया क्वारंटाइनच्या नियमांत बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

वाचा-IPL खेळणं रोहित शर्माला पडणार महागात, 'या' कारणामुळे कसोटी मालिकेला मुकणार

बीसीसीआयच्य सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर क्वारंटाइन नियमांत सूट दिल्यास रोहित आणि इशांत शर्मा दुसऱ्या सराव सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाला पोहचू शकतात. ऑस्ट्रेलिया ए चा दुसरा सराव सामना सिडनीमध्ये 11 ते 13 डिसेंबर दरम्यान होणार आहे. ऑस्ट्रेलिया सरकारच्या प्रोटोकॉलनुसार ऑस्ट्रेलियात आल्यानंतर 14 दिवसांचा क्वारंटाइन बंधनकारक आहे.

निर्णय आता ऑस्ट्रेलियाच्या हाती

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संपर्कात आहे. क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. असे झाल्यास, रोहित आणि इशांत उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला पोहचू शकतात.

वाचा-ऑस्ट्रेलियाविरुद्ध रेट्रो लूकमध्ये दिसणार भारतीय संघ, धवननं शेअर केला PHOTO

IPL खेळणं रोहितला पडणार महागात?

आयपीएल (IPL 2020) दरम्यान मुंबई (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा आणि दिल्ली (Delhi Capitals) चा जलद गोलंदाजइशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे इशांत शर्मा आयपीएलमधून बाहेर झाला होता, तर रोहित चार सामन्यात विश्रांती घेऊन पुन्हा खेळला होता. या दुखापतीमुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नव्हती, पण नंतर वाद झाल्यावर रोहितला टेस्ट टीममध्ये निवडण्यात आलं. मात्र आता रोहित 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी दौऱ्यासाठी फिट होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

वाचा-37 वर्षांनंतर भारत पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध रचणार 'तो' विक्रम

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी दौरा

पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड

दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न

तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी

चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन

Published by: Priyanka Gawde
First published: November 25, 2020, 11:01 AM IST

ताज्या बातम्या