Home /News /sport /

India vs Australia: भारताविरुद्ध शूज न घालता मैदानात उतरणार ऑस्ट्रेलियाचा संघ, कारण वाचून कराल सलाम

India vs Australia: भारताविरुद्ध शूज न घालता मैदानात उतरणार ऑस्ट्रेलियाचा संघ, कारण वाचून कराल सलाम

मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दाखल झाला आहे. मात्र या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एक निर्णय घेतला आहे.

    सिडनी, 17 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन-डे, तीन टी-20 आणि चार टेस्‍ट यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दाखल झाला आहे. मात्र या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एक निर्णय घेतला आहे. या मालिकेत स्वदेशी लोकांच्या संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मैदानात शूज न घालता गोलकार स्थितीत उभे राहतील. याची सुरुवात भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेपासून होईल. ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एकदिवसीय उप-कर्णधार पॅट कमिन्सनं सांगितले की, त्यांच्या संघाला त्यांच्या देशात आणि जगात वर्णद्वेषाच्या समस्येचा सामना करण्याचा हा सर्वात चांगला मार्ग वाटत असल्याचे सांगितले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार कमिन्स म्हणाला की, "आम्ही प्रत्येक सामन्याच्या सुरुवातील शूज न घातला मैदानात येण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही प्रत्येक मालिकेच्या सुरूवातीस हे करू. वाचा-कोरोनामुळे भारत-ऑस्ट्रेलिया दौरा होणार रद्द? अनेक राज्यातील सीमा बंद आमच्यासाठी हा एक अतिशय सोपा निर्णय आहे. केवळ एक खेळ म्हणूनच नव्हे तर आपण पूर्णपणे वर्णद्वेषाच्या विरोधात आहोत ही बाबही यातून स्पष्ट होईल". वाचा-IND vs AUS : टीम इंडिया राहत असलेल्या हॉटेलजवळ विमान अपघात भारत-विरुद्ध ऑस्ट्रेलिया दौरा पहिली ODI : 27 नोव्हेंबर सिडनी दुसरी ODI : 29 नोव्हेंबर - सिडनी तिसरी ODI : 02 डिसेंबर - कॅनबरा पहिली टी20 : 04 डिसेंबर - कॅनबरा दुसरी टी20 : 06 डिसेंबर - सिडनी तिसरी टी20 : 08 डिसेंबर - सिडनी पहिला टेस्ट मॅच : 17 डिसेंबर ते 21 डिसेंबर - एडिलेड दुसरी टेस्ट मॅच : 26 डिसेंबर ते 30 डिसेंबर - मेलबर्न तिसरा टेस्ट मॅच : 07 जानेवारी ते 11 जानेवारी - सिडनी चौथी टेस्ट मॅच : 15 जानेवारी ते 19 जानेवारी - ब्रिसबेन
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या