IND vs AUS : हातात पहिल्यांदाच बॉल देताना रहाणे काय म्हणाला? सिराजने सांगितलं

IND vs AUS : हातात पहिल्यांदाच बॉल देताना रहाणे काय म्हणाला? सिराजने सांगितलं

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला शनिवारपासून सुरूवात झाली. या मॅचमधून मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

  • Share this:

मेलबर्न, 27 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला शनिवारपासून सुरूवात झाली. या मॅचमधून मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने पहिल्याच दिवशी उल्लेखनीय कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या दोन बॅट्समनना माघारी पाठवलं. भारताकडून टेस्ट कॅप मिळवणं हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असल्याचं मोहम्मद सिराज म्हणाला. भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं. पण कोरोनाच्या नियमांमुळे त्याने ऑस्ट्रेलियातच राहण्याचा निर्णय घेतला.

'अजिंक्य रहाणे आणि जसप्रीत बुमराह माझ्याशी बोलत होते, त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. मी बॉलिंग करण्यासाठी व्याकूळ झालो होतो. लंचनंतर अजिंक्य रहाणेने मला बॉलिंग द्यायचं ठरवलं. दोन ओव्हरच बॉलिंग मिळेल, असं रहाणेने मला सांगितलं. लंचनंतर खेळपट्टी बॅट्समनना मदत करायला लागली. त्यामुळे डॉट बॉल टाकण्यावर मी भर दिला,' अशी प्रतिक्रिया मोहम्मद सिराजने दिली.

मोहम्मद सिराजने पहिल्या दिवशी मार्नस लाबुशेन आणि कॅमरून ग्रीन यांच्या विकेट घेतल्या. पहिल्याच दिवशी भारतीय बॉलरनी उल्लेखनीय कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट केला.

Published by: Shreyas
First published: December 27, 2020, 7:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या