Home /News /sport /

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमधल्या भारताच्या कामगिरीवर विराट म्हणाला...

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमधल्या भारताच्या कामगिरीवर विराट म्हणाला...

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने बॉक्सिंग डे टेस्टमधल्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर टीम इंडियाचं (India vs Australia) कौतुक केलं आहे.

    मेलबर्न, 27 डिसेंबर : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने बॉक्सिंग डे टेस्टमधल्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर टीम इंडियाचं (India vs Australia) कौतुक केलं आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेसाठी हा दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. विराटऐवजी अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा कर्णधार आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी रहाणेने उत्कृष्ट नेतृत्व केलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला बुमराह, अश्विन आणि सिराजने घातक बॉलिंग करत 195 रनवर रोखलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराट कोहलीने ट्विट करून टीम इंडियाचं कौतुक केलं. 'पहिल्या दिवशी आम्ही टॉपवर राहिलो. बॉलरनी शानदार कामगिरी करून ठोस अंत केला,' असं विराट म्हणाला. मॅचच्या पाचव्या ओव्हरलाच जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या जो बर्न्सला शून्य रनवर माघारी धाडलं. यानंतर अश्विनने मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांची विकेट घेतली. बुमराहला सर्वाधिक 4 विकेट, तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 आणि रविंद्र जडेजाला एक विकेट मिळाली. भारतात परतण्याआधी विराटचा संदेश पितृत्वाच्या रजेसाठी भारतात परतण्याआधी विराट कोहलीने भारतीय टीमला खास संदेश देऊन टीमचं प्रोत्साहन वाढवलं. ऍडलेड टेस्टमध्ये लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर विराटने टीमला एकजूट राहण्याचा सल्ला दिला. कायम एकमेकांसोबत राहा, दुसऱ्यांच्या यशामुळे आनंदी व्हा आणि मैदानात सहकाऱ्यांची मदत करा, असं विराटने भारतीय खेळाडूंना सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या