IND vs AUS : रहाणेच्या कॅप्टन्स नॉकवर विराट कोहली म्हणतो...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (India vs Australia) टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने धमाकेदार शतक करत भारताला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. अजिंक्य रहाणेच्या या शानदार खेळीवर विराट कोहली (Virat Kohli) याने प्रतिक्रिया दिली आहे.
मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये (India vs Australia) टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने धमाकेदार शतक करत भारताला मजबूत स्थितीमध्ये पोहोचवलं. अजिंक्य रहाणेने 223 बॉलमध्ये 112 रन केले, यामध्ये 12 फोरचा समावेश होता. रहाणेचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 12वं शतक होतं. त्याने सुरुवातीला हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांच्यासोबत अर्धशतकी पार्टनरशीप केली, तर रविंद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात 121 रनची पार्टनरशीप झाली. रहाणेचं शतक आणि जडेजाच्या अर्धशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियापुढे 131 रनची आघाडी घेतली.
अजिंक्य रहाणेच्या या शानदार खेळीवर विराट कोहली (Virat Kohli) याने प्रतिक्रिया दिली आहे. 'भारतासाठी आणखी एक चांगला दिवस. टेस्ट क्रिकेट आज त्याच्या उच्चांकावर होतं. अजिंक्य रहाणेची उत्कृष्ट खेळी,' असं ट्विट विराट कोहलीने केलं आहे.
Another great day for us. Proper test cricket at its best. Absolutely top knock from Jinks@ajinkyarahane88
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून भारतात परतला आहे. ऍडलेडमधली पहिली टेस्ट मॅच संपल्यानंतर विराट भारतात आला. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा 8 विकेटने दारूण पराभव झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 36 रनवर ऑल आऊट केलं होतं. टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटमधला हा सगळ्यात कमी स्कोअर होता.