मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिले ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारताने जबरदस्त बॅटिंग करत 131 रनची आघाडी घेतली. दुसऱ्या इनिंगमध्येही भारताने धमाकेदार बॉलिंग करत ऑस्ट्रेलियाला सहा धक्के दिले. पण तिसऱ्या दिवशी भारताला मोठा धक्का लागला आहे. फास्ट बॉलर उमेश यादवला (Umesh Yadav) चौथी ओव्हर टाकताना त्याला दुखापत झाली, त्यामुळे तो मैदानाबाहेर गेला.
बॉलिंग करत असताना उमेश यादवच्या पोटरीला दुखापत झाली. यानंतर बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. उमेश यादवची दुखापत बघता त्याला रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तिकडे त्याच्या दुखापतीचं स्कॅनिंग केलं जाणार आहे.
उमेश यादवची दुखापत गंभीर असेल, तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल. कारण मागच्या टेस्टमध्येही मोहम्मद शमीला दुखापत झाली होती, त्यामुळे शमी उरलेल्या सीरिजमधून बाहेर झाला आहे. आता उमेश यादव बाहेर गेला तर भारताला अनुभवी बॉलरची कमी जाणवेल. सध्या भारतीय टीमकडे नवदीप सैनी, टी नटराजन आणि शार्दुल ठाकूर हे फास्ट बॉलर पर्याय म्हणून उपलब्ध आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या अजूनही दोन टेस्ट मॅच बाकी आहेत.
दुसऱ्या टेस्टचा तिसरा दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 133-6 एवढा झाला आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे फक्त 2 रनची आघाडी आहे. रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाच्या दोन विकेट घेतल्या, तर बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि आर.अश्विन याला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.