IND vs AUS : चित्त्यापेक्षाही चपळ! पेनने घेतला पुजाराचा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IND vs AUS : चित्त्यापेक्षाही चपळ! पेनने घेतला पुजाराचा भन्नाट कॅच, पाहा VIDEO

पॅट कमिन्स (Pat Cummins) पुन्हा एकदा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची विकेट घेण्यात यशस्वी ठरला. बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी (India vs Australia) कमिन्सने गिल आणि पुजारा यांच्या रुपात भारताला दोन धक्के दिले.

  • Share this:

मेलबर्न, 27 डिसेंबर : पॅट कमिन्स (Pat Cummins) पुन्हा एकदा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याची विकेट घेण्यात यशस्वी ठरला. बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी (India vs Australia) पुजारा आणि शुभमन गिल मैदानात आले तेव्हा भारताचा स्कोअर 36-1 होता. यानंतर शुभमन गिल 45 रनवर आऊट झाला. कमिन्सने शुभमन गिलची विकेट घेतली.

गिलची विकेट घेतल्यानंतर कमिन्सने पुन्हा एकदा भारताला धक्का दिला. चेतेश्वर पुजारा 70 बॉलमध्ये 17 रन करून आऊट झाला. भारतीय इनिंगच्या 24 व्या ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि विकेट कीपर टीम पेन याने पुजाराचा भन्नाट कॅच पकडला.

कमिन्सने टाकलेला बॉल पुजाराच्या बॅटच्या कडेला लागला आणि पहिल्या स्लिपच्या दिशेने गेला, यानंतर टीम पेनने चित्त्यासारखी उडी मारून एका हातात हा कॅच पकडला. त्यामुळे पुजारा पुन्हा एकदा मोठा स्कोअर करण्यात अपयशी ठरला.

बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलरचा दबदबा राहिला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 195 रनवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर अश्विनला 3, मोहम्मद सिराजला 2 आणि रविंद्र जडेजाला 1 विकेट मिळाली.

Published by: Shreyas
First published: December 27, 2020, 10:22 AM IST
Tags:

ताज्या बातम्या