Home /News /sport /

IND vs AUS : रहाणेच्या नेतृत्वावर बोलायला गावसकरांना 'भीती', सांगितलं कारण

IND vs AUS : रहाणेच्या नेतृत्वावर बोलायला गावसकरांना 'भीती', सांगितलं कारण

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) त्यांच्या सडेतोड भूमिकेबाबत कायमच चर्चेत असतात, पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia) दुसऱ्या टेस्टमध्ये त्यांनी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) च्या नेतृत्वावर बोलण्यास नकार दिला.

पुढे वाचा ...
    मेलबर्न, 27 डिसेंबर : भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) त्यांच्या सडेतोड भूमिकेबाबत कायमच चर्चेत असतात, पण त्यांच्या या भूमिकांमुळे अनेकवेळा वादही निर्माण होतात. काहीच दिवसांपूर्वी गावसकर यांनी विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली होती. गावसकर अनेकवेळा कॉमेंट्री करताना मुंबईच्या खेळाडूंबाबत बोलताना दिसतात, पण यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. यावेळी मात्र गावसकर यांनी टीकेपासून लांब राहायचं ठरवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाचा कर्णधार आहे, पण सुनिल गावसकर यांनी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वावर बोलण्यास नकार दिला. टॉस हरल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय टीमने रहाणेच्या नेतृत्वात उल्लेखनीय कामगिरी केली. रहाणेने मॅचच्या 10व्या ओव्हरमध्येच अश्विनला बॉलिंग दिली, ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. यानंतर अश्विनने मॅथ्यू वेड आणि स्टीव्ह स्मिथला आऊट केलं. अश्विनने पहिल्या इनिंगमध्ये 38 रन देऊन 3 विकेट घेतल्या. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचं सगळ्यांकडूनच कौतुक होत असताना सुनिल गावसकर यांनी मात्र याबाबत बोलायला नकार दिला. सोनी स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलत असताना हर्षा भोगले यांनी गावसकरांना रहाणेच्या नेतृत्वावर प्रश्न विचारला. त्यावेळी 'मी रहाणेच्या कर्णधारपदावर बोलणार नाही, कारण मी मुंबईच्या मुलांचं समर्थन करतो, अशी टीका माझ्यावर होईल. पण भारतीय टीमच्या कामगिरीवर मी आनंदी आहे,' अशी प्रतिक्रिया गावसकरांनी दिली. भारतीय बॉलरच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा 195 रनवर ऑल आऊट झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या