DRS च्या त्या नियमावर सचिन नाराज, ICC ला केलं आवाहन

DRS च्या त्या नियमावर सचिन नाराज, ICC ला केलं आवाहन

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने DRS च्या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसी (ICC) ने अंपायर्स कॉल (Umpires Call) ची पुन्हा एकदा संपूर्ण समिक्षा करावी, असं आवाहान सचिनने केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 डिसेंबर : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने DRS च्या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. आयसीसी (ICC) ने अंपायर्स कॉल (Umpires Call) ची पुन्हा एकदा संपूर्ण समिक्षा करावी, असं आवाहान सचिनने केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताला (India vs Australia) या नियमाचा मोठा फटका बसला.

डीआरएसमध्ये एलबीडब्ल्यूच्या वेळी रिव्ह्यू घेतल्यानंतर अंपायर्स कॉलचा मुद्दा येतो. रिव्ह्यूमध्ये जर बॉल स्टम्पऐवजी बेल्सला लागत असेल, तर अंपायर्स कॉल कायम राहतो, म्हणजेच अंपायरचा मैदानातला निर्णय कायम राहतो. म्हणजेच अंपायरने खेळाडूला नॉट आऊट दिलं असेल तर तो खेळाडू बेल्सला बॉल लागला असेल तरी नॉट आऊटच राहतो.

'खेळाडू रिव्ह्यू घेतात, कारण ते मैदानातल्या अंपायरच्या निर्णयावर नाराज असतात. आयसीसीने डीआरएस विशेष करून अंपायर्स कॉलची संपूर्ण समिक्षा करण्याची गरज आहे,' असं ट्विट सचिनने केलं आहे.

जो बर्न्स आणि मार्नस लाबुशेन यांच्याविरोधात भारताने डीआरएस घेतला. त्यानंतर बॉल बेल्सला लागल्याचं रिप्लेमध्ये दिसत होतं. पण अंपायर्स कॉलमुळे दोघांनाही जीवनदान मिळालं. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्न यानेही या नियमांवर टीका केली होती. अंपायर्स कॉलला मी अजूनही समजू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया शेन वॉर्नने दिली.

Published by: Shreyas
First published: December 29, 2020, 6:56 AM IST
Tags:

ताज्या बातम्या