IND vs AUS : चर्चा तर होणारच! जडेजाने पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

IND vs AUS : चर्चा तर होणारच! जडेजाने पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टचं पहिलं सत्र भारताच्या (India vs Australia) नावावर राहिलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने तीन धक्के दिले. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने मॅथ्यू वेड (Mathew Wade) याचा भन्नाट कॅच पकडला.

  • Share this:

मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टचं पहिलं सत्र भारताच्या (India vs Australia) नावावर राहिलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारताने तीन धक्के दिले. लंचपर्यंत ऑस्ट्रेलियाचा स्कोअर 65-3 एवढा झाला. जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. जो बर्न्स शून्य रनवर आऊट झाला, यानंतर पुढच्या दोन्ही विकेट आर.अश्विनने घेतल्या. पण अश्विनच्या यातल्या एका विकेटमध्ये रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने मोलाचं योगदान दिलं.

अश्विनने ऑस्ट्रेलियाचा दुसरा ओपनर मॅथ्यू वेड (Mathew Wade) याला 30 रनवर माघारी धाडलं. मॅथ्यू वेड याने अश्विनने टाकलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने हवेत खेळला. हा कॅच पकडण्यासाठी रविंद्र जडेजा आणि शुभमन गिल दोघंही धावले. एका क्षणी या दोघांची टक्कर होईल, असं वाटत होतं, पण जडेजाने बॉलवर कब्जा करत मॅथ्यू वेडला माघारी धाडलं.

न्यूझीलंडचा ऑलराऊंडर जेम्स नीशम यानेही रविंद्र जडेजा याच्या कॅचचं कौतुक केलं आहे. जडेजाने खरंच हा कॅच पकडला का? असा प्रश्न नीशम याने विचारला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 मॅचदरम्यान जडेजाच्या डोक्याला बॉल लागला, तसंच त्याच्या मांडीच्या स्नायूलाही दुखापत झाली. त्यामुळे तो उरलेल्या दोन्ही टी-20 आणि पहिल्या टेस्ट मॅचमध्ये खेळू शकला नाही.

या टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमने चार बदल केले आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. तर पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना डच्चू देण्यात आला. पितृत्वाच्या रजेसाठी विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला आहे आणि मोहम्मद शमीला पहिल्या टेस्ट मॅचवेळी दुखापत झाल्यामुळे तो उरलेल्या सीरिजला मुकणार आहे. विराटच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याच्याकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.

Published by: Shreyas
First published: December 26, 2020, 8:09 AM IST
Tags:

ताज्या बातम्या