IND vs AUS : वडिलांचं निधनही सिराजला रोखू शकलं नाही, टीम इंडियाच्या भात्यात नवीन अस्त्र

फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने त्याचा वेग, बाऊन्स, स्विंग आणि रिव्हर्स स्विंगने ऑस्ट्रेलियाच्या (India vs Australia) बॅट्समनना चांगलाच त्रास दिला.

फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने त्याचा वेग, बाऊन्स, स्विंग आणि रिव्हर्स स्विंगने ऑस्ट्रेलियाच्या (India vs Australia) बॅट्समनना चांगलाच त्रास दिला.

  • Share this:
    मेलबर्न, 29 डिसेंबर : वडिलांच्या मृत्यूनंतर सावरणं कोणासाठीही सगळ्यात कठीण काम असतं. या दु:खातून बाहेर यायला अनेकांना बराच काळ लागतो. काही जण तर देशासाठी आपल्या वडिलांचं अंतिम दर्शनही घेऊ शकत नाहीत. भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) लाही असाच अनुभव आला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरूवातीलाच मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं, तरीही तो भारतात परतला नाही. सिराजने टीम इंडियासोबतच राहायचा निर्णय घेतला. आपल्या पदार्पणाच्या टेस्टमध्येच सिराजने वडिलांना त्याच्या कामगिरीतून श्रद्धांजली दिली. फास्ट बॉलर मोहम्मद सिराजने त्याचा वेग, बाऊन्स, स्विंग आणि रिव्हर्स स्विंगने ऑस्ट्रेलियाच्या (India vs Australia) बॅट्समनना चांगलाच त्रास दिला. संपूर्ण मॅचमध्ये सिराजने 5 विकेट घेतल्या. सिराजने पहिल्या इनिंगमध्ये 40 रन देऊन 2 विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 37 रन देऊन 3 विकेट पटकावल्या. सिराजने पहिल्या इनिंगमध्ये मार्नस लाबुशेन आणि क्रिस ग्रीनची विकेट घेतली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन आणि नॅथन लायनला माघारी पाठवलं फास्ट बॉलर दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजला या मॅचमध्ये मोहम्मद शमीच्याऐवजी संधी मिळाली होती. ऍडलेडमधल्या पहिल्या टेस्टमध्ये बॅटिंग करत असताना मोहम्मद शमीच्या हाताला दुखापत झाली होती. मागच्या दोन वर्षातला शमी भारताचा टेस्टमधला सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. तर या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अनुभवी उमेश यादव दुखापतग्रस्त झाला होता, त्यामुळे उमेशने दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 3.3 ओव्हर बॉलिंग केली. तर ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी इशांत शर्मा यालाही दुखापत झाली होती, त्यामुळे तोही या दौऱ्याला मुकला. भारताच्या अनुभवी बॉलर्सच्या गैरहजेरीमध्ये सिराजची जबाबदारी वाढली होती. सिराजनेही त्याला मिळालेल्या या संधीचं सोनं केलं.
    Published by:Shreyas
    First published: