IND vs AUS 2nd Test Live Streaming: पाहा किती वाजता सुरू होणार दुसरी टेस्ट

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)च्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)च्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.

  • Share this:
    मेलबर्न, 25 डिसेंबर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy)च्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार 26 डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दारूण पराभव झाला होता. पहिल्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 53 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला. टेस्ट क्रिकेटमधला हा निचांकी स्कोअर होता. दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय टीम मैदानात उतरणार आहे. विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यामुळे अजिंक्य टीमचा कर्णधार असेल. या मॅचसाठी भारतीय टीममध्ये चार बदल करण्यात आले आहेत. पृथ्वी शॉ आणि ऋद्धीमान साहा यांना डच्चू देण्यात आला आहे, तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे सीरिजला मुकणार आहे. या चौघांऐवजी शुभमन गिल, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांना संधी देण्यात आली आहे. कधी सुरू होणार दुसरी टेस्ट? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला 26 डिसेंबरपासून (शनिवार) सुरूवात होणार आहे. कुठे होणार दुसरी टेस्ट? भारत-ऑस्ट्रेलियातली दुसरी टेस्ट मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली जाईल. किती वाजता सुरू होणार मॅच? ही टेस्ट मॅच भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होणार आहे. कुठे पाहता येणार लाईव्ह सामना? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच सोनी सिक्स, सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 वर पाहता येणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिववर पाहता येईल.
    Published by:Shreyas
    First published: