IND vs AUS : नो बॉल ठरला फायद्याचा, बुमराहला मिळाली विकेट

IND vs AUS : नो बॉल ठरला फायद्याचा, बुमराहला मिळाली विकेट

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या (India vs Australia) बॉलरनी शानदार कामगिरी केली. लंचनंतरच्या सत्रात ट्रॅव्हिस हेड (Travis Head)च्या रुपात ऑस्ट्रेलियाने पाचवी विकेट गमावली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने हेडला माघारी धाडलं.

  • Share this:

मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या (India vs Australia) बॉलरनी शानदार कामगिरी केली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कांगारूंच्या तीन विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये दोन विकेट घेण्यात भारताला यश आलं. लंचनंतरच्या सत्रात ट्रॅव्हिस हेड (Travis Head)च्या रुपात ऑस्ट्रेलियाने पाचवी विकेट गमावली. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ने हेडला माघारी धाडलं. हेडला 92 बॉलमध्ये 38 रन करता आले. स्लिपमध्ये अजिंक्य रहाणेने हेडचा कॅच पकडला.

भारताला नशिबाने ट्रेव्हिस हेडची विकेट मिळाली. 42 व्या ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने दोन नो बॉल टाकले होते. या ओव्हरचा दुसरा आणि पाचवा बॉल नो बॉल होता. यानंतर पुढच्याच बॉलला ट्रॅव्हिस हेड आऊट झाला. या ओव्हरमध्ये बुमराहने दोन नो बॉल टाकले त्यामुळे त्याला जास्तीचे दोन बॉल टाकण्याची संधी मिळाली, पण यामुळे भारताला मात्र विकेट मिळाली.

बुमराहचा ऐतिहासिक नो बॉल

याआधी जसप्रीत बुमराहने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टाकलेला नो बॉल भारतासाठी घातक ठरला होता. जसप्रीत बुमराह याने पाकिस्तानविरुद्धच्या फायनलमध्ये नो बॉल टाकला होता. हा नो बॉल भारताला चांगलाच महागात पडला होता. बुमराहने टाकलेल्या या नो बॉलवर फकर जमान आऊट झाला होता, पण नो बॉल असल्यामुळे त्याला जीवनदान मिळालं. पुढे फकर जमानने शतक केलं, आणि फायनलमध्ये भारताला पराभूत व्हावं लागलं.

Published by: Shreyas
First published: December 26, 2020, 10:17 AM IST
Tags:

ताज्या बातम्या