IND vs AUS : भारताचं धमाकेदार पुनरागमन, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय

IND vs AUS : भारताचं धमाकेदार पुनरागमन, बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय

ऍडलेडमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला भारताने (India vs Australia) मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला आहे.

  • Share this:

मेलबर्न, 29 डिसेंबर : ऍडलेडमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवाचा बदला भारताने (India vs Australia) मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 70 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दोन विकेट गमावल्या. मयंक अगरवाल (Mayank Agarwal) 5 रनवर तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 3 रनवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. शुभमन गिल (Shubhaman Gill) 30 रनवर तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)  27 रनवर नाबाद राहिले.

चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाने 68 रनमध्ये उरलेल्या 4 विकेट गमावल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा 200 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये 131 रनची आघाडी मिळाल्यामुळे भारताला 70 रनचं आव्हान मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि आर.अश्विनला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, उमेश यादवला एक विकेट घेण्यात यश आलं.

तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची अवस्था 99-6 अशी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीने पुन्हा एकदा भारताला त्रास दिला. कमिन्स आणि ग्रीन यांच्यात 57 रनची पार्टनरशीप झाली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमरून ग्रीनने सर्वाधिक 45 रनची खेळी केली.

टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 195 रनवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने 326 रन केले. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)ने शानदार शतक आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने अर्धशतक केलं, ज्यामुळे भारताला 131 रनची मोठी आणि महत्त्वाची आघाडी मिळाली.

या सीरिजच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताला दारूण पराभव पत्करावा लागला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय टीमचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. टेस्ट क्रिकेटमधला भारताचा हा निच्चांकी स्कोअर होता. ऍडलेडनंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) च्या अनुपस्थितीमध्ये भारतीय टीम मैदानात उतरली होती. विराट कोहली पितृत्वाच्या रजेमुळे भारतात परतला आहे, तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे उरलेली सीरिज खेळू शकणार नाही.

Published by: Shreyas
First published: December 29, 2020, 6:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या