Home /News /sport /

IND vs AUS Day 2nd Test : टीम इंडिया विजयाजवळ, तिसऱ्या दिवशीही भारतीय बॉलर चमकले

IND vs AUS Day 2nd Test : टीम इंडिया विजयाजवळ, तिसऱ्या दिवशीही भारतीय बॉलर चमकले

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 133-6 एवढी झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाकडे फक्त 2 रनची आघाडी आहे.

    मेलबर्न, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारतीय टीम (India vs Australia) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाची अवस्था 133-6 एवढी झाली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाकडे फक्त 2 रनची आघाडी आहे. दिवसाअखेरीस कॅमरून ग्रीन 17 रनवर आणि पॅट कमिन्स 15 रनवर नाबाद खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या 6 विकेट 99 रनवरच गमावल्या होत्या, पण ग्रीन आणि कमिन्स यांनी संयमी खेळी करत भारतीय बॉलरना आजच्या दिवसात अजून विकेट मिळवून दिली नाही. भारताकडून रविंद्र जडेजाने 2 विकेट घेतल्या, तर बुमराह, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि अश्विन यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा 326 रनवर ऑल आऊट झाला, त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये भारताला 131 रनची महत्त्वाची आघाडी मिळाली.  तिसऱ्या दिवसाची सुरूवात 277-5 अशी करणाऱ्या भारताने अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांची विकेट सुरूवातीला गमावली. अजिंक्य रहाणे 112 रनवर रन आऊट झाला, तर रविंद्र जडेजाला 57 रनवर स्टार्कने माघारी पाठवलं. यानंतर आर.अश्विन 14 आणि उमेश यादव 9 रन करून तर जसप्रीत बुमराह शून्य रनवर आऊट झाले. मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन यांनी भारताच्या 3 विकेट घेतल्या, तर पॅट कमिन्सला 2 आणि जॉस हेजलवूडला एक विकेट मिळाली. ऑस्ट्रेलियाने या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय बॉलरनी शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 195 रनवर रोखलं होतं. पहिल्या टेस्टमध्ये दारूण पराभव झाल्यानंतर या टेस्ट मॅचमध्ये पुनरागमन करण्याचं मोठं आव्हान भारतीय टीमपुढे आहे. पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. भारताचा टेस्ट क्रिकेटमधला हा निचांकी स्कोअर होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या