मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : टीम इंडियाची चिंता वाढली, म्हणून वेळेआधीच मेलबर्नला पोहोचला वॉर्नर

IND vs AUS : टीम इंडियाची चिंता वाढली, म्हणून वेळेआधीच मेलबर्नला पोहोचला वॉर्नर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. यानंतर आता सीरिजची दुसरी टेस्ट मॅच 26 डिसेंबरपासून मेलबर्नला सुरू होणार आहे. या मॅचआधी ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) मेलबर्नला रवाना झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas
मेलबर्न, 20 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दारूण पराभव झाला. यानंतर आता सीरिजची दुसरी टेस्ट मॅच 26 डिसेंबरपासून मेलबर्नला सुरू होणार आहे. या मॅचआधी ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) मेलबर्नला रवाना झाला आहे. सिडनीमध्ये वाढत चालेल्या कोरोना संक्रमणामुळे वॉर्नर प्रायव्हेट जेटने मेलबर्नला पोहोचला आहे. डेव्हिड वॉर्नर मागच्या महिन्यात भारताविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता, यानंतर सिडनीमध्येच त्याच्यावर उपचार सुरू होते. पण आता सिडनीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे, त्यामुळे व्हिक्टोरिया सिडनीमधून येणाऱ्या लोकांसाठी सीमा बंद करण्यात आल्या आहेत, म्हणून वॉर्नर आणि एबॉट वेळेआधीच मेलबर्नला गेले आहेत. वॉर्नर आणि एबॉट यांचा ऑस्ट्रेलियाच्या 17 सदस्यीय टेस्ट टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण दुखापतीमुळे दोन्ही खेळाडूंना पहिली टेस्ट मॅच खेळता आली नाही. सिडनी मॉर्निग हेराल्डच्या वृत्तानुसार कोरोना हॉटस्पॉटचा दौरा या दोघांनी केला नसला, तरी क्रिकेट ऑस्ट्रेलिया कोणताही धोका पत्करू इच्छित नाही, म्हणून दोन्ही खेळाडूंना तीन दिवस विलगिकरणात ठेवण्यात येणार आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण बघता न्यू साऊथ वेल्स सरकार निर्बंध आणखी कडक करणार आहे. कोरोना रोखण्यासाठी व्हिक्टोरिया सिडनीमधून येणाऱ्या लोकांसाठी सीमा बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शनिवारीच दोन्ही खेळाडूंना मेलबर्नला रवाना केलं. वॉर्नर पुनरागमनासाठी तयार डेव्हिड वॉर्नरला मेलबर्न टेस्ट खेळण्याची अपेक्षा आहे. आपण सध्या 14 किमी चालत असून पुढच्या आठवड्यात 26-30 किमी चालण्याचा प्रयत्न करू, असं वॉर्नरने सांगितलं. खेळपट्टीवर धावू शकलो आणि फिल्डिंग करू शकलो, तर पुन्हा मैदानात उतरू असं वॉर्नर म्हणाला आहे. सिडनीमधला कोरोनाचा वाढता आकडा बघता शेवटच्या दोन टेस्टमध्ये अदलाबदली करण्याचाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा विचार आहे. सिडनीमध्ये 7-11 जानेवारीदरम्यान तिसरी टेस्ट आणि ब्रिस्बेनमध्ये 15 जानेवारीपासून शेवटची चौथी टेस्ट होणार आहे, पण कोरोनामुळे सिडनीमध्ये शेवटची आणि ब्रिस्बेनमध्ये तिसरी टेस्ट होऊ शकते. या दोन्ही टीममध्ये मेलबर्नला 26 डिसेंबरपासून दुसरी टेस्ट सुरू होईल, पण काही वृत्तांनुसार तिसरी टेस्टही मेलबर्नमध्ये होऊ शकते.
First published:

पुढील बातम्या