IND vs AUS : थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद, टीम इंडियानेही घेतला आक्षेप

IND vs AUS : थर्ड अंपायरच्या निर्णयावरून वाद, टीम इंडियानेही घेतला आक्षेप

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलरनी (India vs Australia) चमकदार कामगिरी केली. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवला असला, तरी थर्ड अंपायर (third umpire) ने दिलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला. या निर्णयावर टीम इंडियानेही आक्षेप घेतले.

  • Share this:

मेलबर्न, 26 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉलरनी (India vs Australia) चमकदार कामगिरी केली. 195 रनवरच ऑस्ट्रेलियाची टीम ऑल आऊट झाली. जसप्रीत बुमराहने 4, अश्विनने 3, मोहम्मद सिराजने 2 आणि रविंद्र जडेजाने एक विकेट घेतली. भारताने ऑस्ट्रेलियाचा डाव लवकर संपवला असला, तरी थर्ड अंपायर (third umpire) ने दिलेल्या एका निर्णयामुळे वाद निर्माण झाला. या निर्णयावर टीम इंडियानेही आक्षेप घेतले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन (Tim Paine) 16 बॉलमध्ये 6 रनवर खेळत असताना कॅमरून ग्रीनने त्याला एक रनसाठी बोलावलं. कव्हरवर फिल्डिंग करत असलेल्या उमेश यादवने बॉल ऋषभ पंत (Rishabh Pant) कडे फेकला आणि पंतने बॉल स्टम्पला लावून अपील केलं. यानंतर मैदानातल्या अंपायरनी थर्ड अंपायरकडे निर्णय विचारला. टीम पेनची बॅट क्रीजमध्ये आली का नाही, याबाबत संशय होता, त्यामुळे थर्ड अंपायरने पेनला नॉट आऊट दिलं. याचं टीम इंडियाच्या खेळाडूंनाही आश्चर्य वाटलं. यात काहीतरी संशयास्पद आहे, थर्ड अंपायरने आऊट कसं दिलं नाही? असं वक्तव्य टीम इंडियाच्या खेळाडूने केलं. हे वक्तव्य स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झालं. हे वाक्य ऋषभ पंत याने उच्चारल्याचं बोललं जात आहे.

थर्ड अंपायरने दिलेल्या या निर्णयाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. थर्ड अंपायरच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली.

पहिल्या दिवसाअखेर भारताचा स्कोअर 36-1 एवढा आहे. शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा मैदानात आहेत. भारत अजून 159 रननी पिछाडीवर आहे.

Published by: Shreyas
First published: December 26, 2020, 1:52 PM IST
Tags:

ताज्या बातम्या