Home /News /sport /

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमधल्या विजयानंतर कर्णधार रहाणेची पहिली प्रतिक्रिया

IND vs AUS : बॉक्सिंग डे टेस्टमधल्या विजयानंतर कर्णधार रहाणेची पहिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दणदणीत विजय झाला. मेलबर्नमधल्या भारताच्या या विजयाचा हिरो कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) होता.

    मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दणदणीत विजय झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 70 रनचं आव्हान भारताने 2 विकेट गमावून पूर्ण केलं. 4 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 1-1 ने बरोबरी केली आहे. मेलबर्नमधल्या भारताच्या या विजयाचा हिरो कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) होता. रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये आपलं 12वं शतक केलं. पहिल्या इनिंगमध्ये 112 रन करणाऱ्या अजिंक्य रहाणेने दुसऱ्या इनिंगमध्येही नाबाद 27 रनची खेळी केली. रहाणेने कर्णधाराबरोबरच बॅट्समन म्हणूनही विजयात मोलाचं योगदान दिलं. या कामगिरीबद्दल रहाणेला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. अजिंक्य रहाणेने टीम इंडियाच्या या विजयाचं श्रेय आपली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या मोहम्मद सिराज आणि शुभमन गिल यांना दिलं. 'ऍडलेडमधल्या पराभवानंतर सकारात्मक क्रिकेट खेळण्याची आणि जिगर दाखवण्याची गरज होती. खासकरून जेव्हा उमेश यादवला दुखापत झाली,' असं रहाणे म्हणाला. 'आमच्यासाठी पाच बॉलरची रणनीती कामाला आली. आम्ही ऑलराऊंडरबद्दल विचार करत होतो आणि जडेजाने शानदार खेळ केला. गिलची प्रथम श्रेणी क्रिकेटमधली कामगिरी जबरदस्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तो शॉट खेळू शकतो हे त्याने दाखवून दिलं. सिराजनेही बॉलिंगमध्ये अनुशासन दाखवलं, ज्याचं कौतुक आहे. पहिल्याच सामन्यात बॉलिंग करणं कठीण असतं, पण प्रथम श्रेणी क्रिकेटचा अनुभव सिराजच्या कामाला आला,' अशी प्रतिक्रिया रहाणेने दिली. ऍडलेड टेस्टमध्ये भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 36 रनवर ऑल आऊट झाला होता. टेस्ट क्रिकेटमधला हा भारताचा निचांकी स्कोअर होता. या पराभवानंतर भारताने जोरदार पुनरागमन केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या