Home /News /sport /

IND vs AUS : अजिंक्यने पुन्हा जिंकली मनं, मैदानातून बाहेर जाताना...

IND vs AUS : अजिंक्यने पुन्हा जिंकली मनं, मैदानातून बाहेर जाताना...

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दणदणीत विजय झाला. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला.

    मेलबर्न, 29 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये भारताचा (India vs Australia) दणदणीत विजय झाला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 70 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट गमावून केला. टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) भारताच्या या विजयाचा शिल्पकार ठरला. पहिल्या इनिंगमध्ये शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेने दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद 27 रन केले. अजिंक्य रहाणेने या मॅचमध्ये बॅटिंगनेच नाही तर त्याच्या वर्तणुकीनेही क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. मैदानाबाहेर जाताना अजिंक्य रहाणेने आपल्या पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) ला नेतृत्व करण्याची संधी दिली. त्याआधी जडेजाने रन आऊट केल्यानंतरही रहाणेने मनाचा मोठेपणा दाखवला होता. शतकी खेळी केल्यानंतर रहाणे जडेजाच्या चुकीमुळे रन आऊट झाला. यानंतर जडेजा निराश झाला, तेव्हा रहाणे तातडीने त्याच्या दिशेने गेला आणि त्याला दिलासा दिला. पहिल्या टेस्टमध्ये रहाणेच्या चुकीमुळे विराट रन आऊट झाला होता, तेव्हा त्याने जाऊन विराटची माफीही मागितली होती. टेस्ट क्रिकेटमध्ये रन आऊट होण्याची रहाणेची ही पहिलीच वेळ होती. या मॅचमध्ये मोहम्मद सिराजने एकूण 5 विकेट घेतल्या. सिराजने पहिल्या इनिंगमध्ये 40 रन देऊन 2 विकेट आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 37 रन देऊन 3 विकेट पटकावल्या. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 200 रनवर ऑल आऊट केल्यानंतर भारतीय टीम ड्रेसिंग रूममध्ये चालली होती, तेव्हा मैदानाबाहेर जाताना सिराजने टीमचं नेतृत्व केलं. सिराजने पहिल्या इनिंगमध्ये मार्नस लाबुशेन आणि क्रिस ग्रीनची विकेट घेतली. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन आणि नॅथन लायनला माघारी पाठवलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या